घरमनोरंजनतैमूरच्या घरी कलरफूल 'बाप्पा' विराजमान; करीनाने केले फोटो शेअर

तैमूरच्या घरी कलरफूल ‘बाप्पा’ विराजमान; करीनाने केले फोटो शेअर

Subscribe

गणेशोत्सवाच्या रंगात सगळे भाविक रंगले असतानाच सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर यानेही घरामध्ये कलरफूल बाप्पा विराजमान केले आहे. करीनाने तिच्या सोशल मीडियावर या आगळ्या वेगळ्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. तैमूरने त्याच्या खेळण्यातील ब्लॉक्समधून हा बाप्पा साकारला आहे. त्याच्या डोक्यावर मंडपदेखी ल्बॉक्सपासूनच बनवले आहे. देवासमोर हात जोडून प्रार्थना करतानाचा तैमूरचा फोटो करीनाने शेअर केला आहे. लहानच्या तैमूरच्या कल्पनेतील हा कलरफूल गणपती सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

- Advertisement -

तैमूरने फक्त गणपती बाप्पाच नाही तर त्याचे डेकोरेशन, त्याला दाखवण्यात येणार प्रसाद, मंडपातील आरास हेदेखील ठेवले आहे. शिवाय बाप्पासमोर खेळण्यातील तैमूर आणि त्याचे आई-वडिल बसल्याचे त्याने दाखवले आहेत. करीनाने त्याचे हे फोटो शेअर करताना, यंदाचा गणपती उत्सव कदाचित वेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी तैमूरने त्याचा बाप्पा साकारून उत्सवात रंगत आणली आहे. असे पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच तिने सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. सर्वांना शांतता, उत्तम आरोग्य आणि सुरक्षा लाभो अशी प्रार्थनादेखील केली आहे.

हेही वाचा –

दिल्ली पोलिसांनी ISIS चा कट उधळला; IED स्फोटकांसह एका अतिरेक्याला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -