घरदेश-विदेशमहिला पोलिसाने अनाथ बाळाला पाजले दूध

महिला पोलिसाने अनाथ बाळाला पाजले दूध

Subscribe

हैदराबादमधील एका महिला कॉन्स्टेबल प्रियंका यांनी अनाथ बाळाला दूध पाजून आपल्या मातृत्वाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

महिला पोलीस नेहमीच आपले कर्तव्य बजावत असतात. हे कर्तव्य बजावत असताना त्यांना आपल्या संसाराचा गाडा देखील हाकलावा लागतो. मात्र त्यावेळी त्यांना आपल्या मातृत्वाचे देखील भान राखावे लागते. मातृत्व म्हटलं का आईला मायेचा पाझर फुटतो. असाच पाझर हैदराबादच्या बेगमपेठे पोलीस ठाण्यात एका महिला पोलिसाला फुटला आहे. खाकी वर्दीतल्या या आईच्या मायेनं एका अनाथ लोकराला दूध पाजलं आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका यांनी भुकेने व्याकूळ झालेल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला स्तनपान केले आहे.

नेमके काय घडले?

हैदराबादमधील बेगमपेठ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल प्रियंका सध्या बाळंतुणाच्या रजेवर आहेत. मात्र पतीच्या एका फोनवर त्यांनी पोलीस ठाणे गाठले आहे. उस्मानिया रुग्णालयाजवळ प्रियंका यांचे पती उभे होते. त्यांच्या हातात येऊन एका महिलेने आपले बाळ दिले आणि या बाळाला थोडावेळ सांभाळा मी पाणी घेऊन येत असे सांगून ती महिला त्या ठिकाणाहून निघाली. खूप वेळ झाला तरी ती महिला त्या ठिकाणी आली नाही. मात्र ते बाळ प्रचंड रडत होते. ते बाळ रडत असल्याचे पाहून त्या बाळाला फूक लागली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रियंकाला फोन करुन पोलीस ठाण्यात बोलावले. प्रियंका पोलीस ठाण्यात आल्यानंतर प्रियंकाने त्या अनाथ बाळाला दूध पाजले आणि त्यानंतर त्या बाळाला रुग्णालयात देखील घेऊन गेले.

- Advertisement -

सोशल मीडियावर कौतुक

महिला पोलीस प्रियंका यांच्या दातृत्वाचे आणि खाकी वर्दीतल्या मातृत्वाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे महिला पोलीस के प्रियंका यांनी जी संवेदनशील दाखवली त्यासाठी हैद्राबाद पोलीस आयुक्तांनी के प्रियंका आणि तिचे पोलीस पती एम रवींदर यांना सन्मानित केले आहे.

- Advertisement -

वाचा – नायर रुग्णालयातील ‘ह्युमन मिल्क बँक’ नवजात बाळांसाठी वरदान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -