‘अभिनंदन’ वर्धमान, स्वातंत्र्य दिनी शौर्याला सलाम

abhinandan varthaman
अभिनंदन वर्धमान

पाकिस्तानच्या बलाढ्या एफ १६ विमानाचा चक्काचूर करणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना स्वातंत्यदिनी वीरचक्र प्रदान करण्यात येणार आहे. पाक व्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने आपली लढाऊ विमाने भारतात पाठवली होती, त्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले होते. मात्र भारताने दबावतंत्राचा वापर करत अभिनंदनला सोडवून आणले होते. अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांना वीरचक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

भारतीय वायू दलातील स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. बेळगावचे शहीद जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्तीचक्र देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी शौऱ्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असते.