घरताज्या घडामोडीगुजरातमध्ये दारु प्या अन् पिंजऱ्यात जा

गुजरातमध्ये दारु प्या अन् पिंजऱ्यात जा

Subscribe

गुजरातच्या अहमदाबाद,अमरेली,राजकोट,कच्छ यासारख्या जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये देखील या उपक्रम राबवण्यात आला आहे.

देशात गुजरात राज्यात दारू बंदी आहे. मात्र तरीही गुजरातच्या काही भागांमध्ये अनेक लोक दारू पितात. काही जणांचा दारु प्यायल्या शिवाय दिवस सुरू होत नाही. गुजरातच्या अहमदाबाद जवळील मोतीपुरा गावातील लोकांनी तिथल्या तळीरामांची दारू सोडवण्यासाठी भन्नाट कल्पना राबवली आहे. मोतीपुरा गावातील जवळपास सर्व लोकं मोलमजूरी करुन आपली उपजिविका करतात. असे असताना तेथील अनेक कुटुंबातील लोक मिळालेले पैसे दारू पिण्याच वाया घालवतात. दारुमुळे गावातील अनेकांवर वाईट परिस्थिती आली. अनेकांच्या घरातील पुरुषांच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता गावात कोणताही पुरुष दारू प्यायल्यास त्याला बंद पिंजऱ्याच ठेवण्यात येते. दारू पिण्याच्या विषय जरी काढल्यास त्याला शिक्षा म्हणून बंद पिंजऱ्यात ठेवण्यात येते. सध्या या गावाची गुजरातमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद,अमरेली,राजकोट,कच्छ यासारख्या जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये देखील या उपक्रम राबवण्यात आला आहे.

अहमदाबादच्या साणंदच्या महजपासून सात किलोमीटर हे मोतीपूरा गाव आहे. हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून दारुमुळे त्रासले आहे. गावातील १०० हून अधिक महिला विधवेचे आयुष्य जगत आहेत. दारुच्या व्यवसानाने त्रासलेल्या या गावाने अनेक वेळा सरकारकडे यावर काही उपाययोजना करण्याची विनंती केली होती मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन हा उपक्रम गावात राबवण्याचे ठरवले.

- Advertisement -

गावातील महिलांनी हा पिंजरा तयार केला. गावात दारू पिणाऱ्याला या पिंजऱ्यात डांबून ठेवले जाते. त्याचप्रमाणे २५ रुपयांचा दंड आकारला होता. मोतीपूरा गावाने राबवलेला हा उपक्रम इतर गावांनी देखील सुरू केला. आता जवळपास २४ गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गावातील महिलांनी या उपक्रमात मोठे योगदान दिले आहे. आतापर्यंत गावातील महिलांनी ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड आकारला आहे.


हेही वाचा – यंत्रणांचे काम कोणाला घाबरवण्याचे असू नये; पंतप्रधान मोदींचा CVC, CBI ला सल्ला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -