घरदेश-विदेशIIT JEE Advance Results: राजस्थानच्या मृदूलने ९९.६६ गुण मिळवून रचला नवा इतिहास

IIT JEE Advance Results: राजस्थानच्या मृदूलने ९९.६६ गुण मिळवून रचला नवा इतिहास

Subscribe

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूरतर्फे जेईई अॅडव्हान्स रिझल्ट २०२१ (JEE Advanced Examination) (IIT-JEE Advanced 2021) ची घोषणा आज झाली आहे. या परीक्षेत राजस्थानचा मृदूल अग्रवाल हा अव्वल आला आहे. मृदुल हा राजस्थानच्या कोटा येथे एलन कोचिंगचा विद्यार्थी आहे. तो मूळचा जयपूरचा आहे. त्याने IIT-JEE Advanced 2021 मध्ये ३६० पैकी३४८ गुण मिळात यंदा टॉप केले आहे. आजपर्यंत जेईई अॅडव्हान्स च्या इतिहासात कोणत्याही विद्यार्थ्याला इतके गुण मिळाले नव्हते.

JEE Advanced परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाले आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२१ पर्यंत होती.

- Advertisement -

जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, joSAA अंतर्गत नोंदणी आणि निवड भरण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०वाजता पहिल्या मॉक सीटचे वाटप होईल. दुसऱ्या सीट वाटपाची यादी २४ ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल.

जेईई मेनमध्ये चांगले गुण मिळवत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपैकी २.५ लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेत बसण्याची संधी मिळते, परंतु यावेळी केवळ १६०,००० विद्यार्थ्यांनीच परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

- Advertisement -

असा पहा ऑनलाईन निकाल

१) सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.

२) अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर रिजल्ट लिंकवर क्लिक करा.

३) उमेदवाराने वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा.

४) रिजल्ट तुमच्या समोर दाखवला जाईल.

५) रिजल्टची एक प्रत डाउनलोड करा आणि ती आपल्याकडे ठेवा.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -