घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनचा कधी विस्फोट होणार आणि कधी दिलासा मिळणार? IITच्या वैज्ञानिकांनी...

Omicron Variant: ओमिक्रॉनचा कधी विस्फोट होणार आणि कधी दिलासा मिळणार? IITच्या वैज्ञानिकांनी सांगितले

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे हळूहळू चिंतेचे वातावरण पसरत चालले आहे. सुरुवातीला ओमिक्रॉन आढळल्यानंतर हा व्हेरिएंट जास्त घातक नसून फक्त अधिक वेगाने पसरणारा असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ओमिक्रॉनमुळे देशात तिसरी मोठी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चिंता वाढली असून सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहेत. दरम्यान आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी देखील चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.

आयआयटी कानपूर मनिंद्र अग्रवाल आणि Sutra model of tracking the pandemic trajectoryचे सह संस्थापक आयआयटी हैदराबादचे एम विद्यासागर यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये दररोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची १.५ ते १.८ लाखांपर्यंत नोंद होऊ शकते. नवा व्हेरिएंटचा ज्या वेगाने प्रादुर्भाव वाढेल, त्या वेगाने कमी होईल. दक्षिण आफ्रिकेत पहिल्या तीन आठवड्यात रुग्णांची संख्या शिगेला पोहोचली होती, परंतु त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घसरण सुरू झाली. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोना केसेसची संख्या १५ डिसेंबरला जवळपास २३ हजार अशी उच्चांकी संख्या होती. आता २० हजारांच्या खाली केसेस आढळत आहेत.

- Advertisement -

पुढे आयआयटी वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात ओमिक्रॉनच्या केसेस चिंता वाढवणाऱ्या नाहीत. परंतु सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. तसेच अजूनपर्यंत ओमिक्रॉन किती घातक आहे, याबाबत ठोस माहिती मिळाली नाही आहे.

देशभरात आतापर्यंत २१३ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण दिल्लीत आढळले आहेत. दिल्लीत ५७, महाराष्ट्रात ५४, तेलंगणा २४, कर्नाटक १९, राजस्थान १८, केरळ १५, गुजरात १४, जम्मू-काश्मीर ३, ओडिसा २, उत्तर प्रदेश २, आंध्र प्रदेश १, चंदीगड १, लडाख १, तामिळनाडून १, पश्चिम बंगाल १ ओमिक्रॉनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: WHOचा इशारा; ओमिक्रॉनचे युरोपात येणार वादळ!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -