घरदेश-विदेशकरवा चौथच्या दिवशी देशभरात तब्बल 300 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याची विक्री

करवा चौथच्या दिवशी देशभरात तब्बल 300 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याची विक्री

Subscribe

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती.

मागील दोन वर्षांपासून प्रत्येक सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते पण या वर्षी मात्र सण उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच सोन्याची खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती. (Gold worth more than 300 crores sold across the country on Karva Chauth)

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशन या देशातील छोट्या ज्वेलर्सची मोठी संघटना आहे. यांनी गुरूवारी सांगितले की, कोरोना महामारीमुळे करवा चौथच्या दिवशी देशभरातील सराफा बाजारात मंदी होती. 2020 आणि 2021 ही दोन्ही वर्षे मंदिराचं गेली. पण यावर्षी मात्र कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळेच सणासुदीच्या काळात लोक जास्त खरेदी करत आहेत. त्याच सोबत सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे नागरिकांचा जास्त कल आहे. त्यामुळे या वर्षी करवा चौथच्या दिवशी सराफा बाजारात अधिक गर्दी झाली होती. यावर्षी सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

- Advertisement -

सोने 3,400 रुपयांनी महागले

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 3,400 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी 11,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. दिल्लीत गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा भाव 59,000 रुपये होता.

- Advertisement -

दिल्लीसह या शहरांमध्ये सोन्याची विक्रमी खरेदी

कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी भरतिया यांनी सांगितले की, दिल्ली व्यतिरिक्त मुंबई, आग्रा, कानपूर, हैदराबाद, नागपूर, रायपूर, राजकोट, मेरठ, कोलकाता, अमृतसर, जयपूर, भोपाळ, इंदूर, जम्मू, लखनऊ या शहरांमधील सराफा बाजारांमध्ये नागरिकांनी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

या दागिन्यांना जास्त मागणी आहे

अखिल भारतीय ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सांगितले की, यावेळी जड आणि हलक्या दागिन्यांचा मोठा साठा बाजारामध्ये होता. एकीकडे पारंपरिक सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या साठ्याबरोबरच लेटेस्ट डिझाइन्सच्या दागिन्यांचीही मोठी मागणी होती. वधूच्या अंगठ्या, चेन, बांगड्या, मंगळसूत्रा या दागिन्यांना यावर्षी मोठी मागणी होती.

येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात वाढ

सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, धनत्रयोदशी, दिवाळीपासून 14 नोव्हेंबरपर्यंत लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या बाजारपेठा गजबजलेल्या असतात. पण, जागतिक स्तरावर राजकारणामुळे येत्या काळात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले.


हे ही वाचा – फळे-भाज्यांच्या किमती कडाडल्या; महागाईच्या दरात ०.४१ टक्क्यांनी वाढ

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -