घरअर्थजगतफळे-भाज्यांच्या किमती कडाडल्या; महागाईच्या दरात ०.४१ टक्क्यांनी वाढ

फळे-भाज्यांच्या किमती कडाडल्या; महागाईच्या दरात ०.४१ टक्क्यांनी वाढ

Subscribe

सप्टेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईच्या दरात वाढ होत आहे.

नवी दिल्ली – देशात महागाईचा दर पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात ०.४१ टक्क्यांनी किरकोळ महागाईचा दर वाढला आहे. या वर्षातील एप्रिल महिन्यानंतर ही सर्वाधिक वाढ आहे. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर सात टक्क्यांवर होता. तर, आता सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर ७.४१ टक्के झाला आहे. जुलैमध्ये महागाई दर ६.७१ टक्के तर, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ५.३ टक्के महागाई दर होता. फळे आणि भाज्यांचे भाव कडाडल्याने महागाईचा दर वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! अदानी ग्रुपला दूरसंचार सेवेसाठी मिळाला परवाना; ‘या’ राज्यांतील ग्राहकांना मिळणार लाभ

- Advertisement -

गेल्यावर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये किरकोळ महागाई दर ४.३५ टक्के होता. खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे किरकोळ महागाई दरात मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई ८.६० टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये ७.६२ महागाई दर होता. सप्टेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईच्या दरात वाढ होत आहे.

हेही वाचा सहा महिन्यांत 8.98 लाख कोटींचे प्रत्यक्ष करसंकलन, 23.8 टक्क्यांची वाढ

- Advertisement -

महागाई ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास आरबीआयला केंद्र सरकारला अहवाल सादर करावा लागतो. या अहवालात रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई दर २-६ टक्क्यांच्या मर्यादेत का ठेवण्यात अपयश आले हे स्पष्ट करावे लागते. केंद्र सरकारने RBI ला किरकोळ महागाई २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जाणवलेला तीव्र आयात महागाईचा दबाव कमी झाला आहे, परंतु अन्न आणि ऊर्जा वस्तूंवरील दबाव अजूनही कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -