घरCORONA UPDATEआधी Alpha नंतर Delta वेरिएंटचा संसर्ग,लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ६१ वर्षीय डॉक्टरला...

आधी Alpha नंतर Delta वेरिएंटचा संसर्ग,लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ६१ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण

Subscribe

ऑगस्ट २०२०मध्ये त्यांना कोरोना विरोधी लस घेण्याआधी एकदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी लस घेतली व लस घेतल्यानंतर कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली.

सध्या देशातील कोरोना (Covid19) आटोक्यात आल्याचे म्हटले जात असताना कोरोनाचे अनेक वेरिएंट समोर आलेत. या वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोरोना विरोधी लस घेणे महत्त्वाचे मानले जाते. मात्र कोरोना विरोधी लस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अनेकांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील जवळपास २-३ वेळा कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतही एका महिला डॉक्टरला तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. असाच प्रकार दिल्लीतून देखील समोर आलाय. दिल्लीत राहणाऱ्या ६१ वर्षीय डॉक्टरला तब्बल तीन वेळा कोरोनाची लागण झाली. कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ही महिला कोरोना वेरिएंटची शिकार झाली. या डॉक्टर महिलेला आधी अल्फा (Alpha variant) त्यानंतर डेल्टा वेरिएंटची (Delta varient)  लागण झाली. (in Delhi 61-year-old doctor infected with corona after taking two doses of vaccine,First Alpha, then Delta variant infection )

हार्ट केअर फाउंडेशनने या कोरोना रुग्णांवर अभ्यास केला. या अभ्यासात असा दावा केला की, डॉक्टरांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांना पहिल्यांदा कोरोनाच्या अल्फा वेरिएंटची लागण झाली. त्यानंतर डेल्टा वेरिएंटची लागण झाली. पहिल्या वेरिएंटच्या वेळी त्यांना तितकासा त्रास झाला नाही मात्र दुसऱ्या वेरिएंटची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. दिल्लीतील या ६१ वर्षीय डॉक्टर तीन वेळा कोरोनाची शिकार झाल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या हायपोक्सिया म्हणजेच श्वासोच्छावासाच्या तक्रारीला देखील समोऱ्या जात होत्या. ऑगस्ट २०२०मध्ये त्यांना कोरोना विरोधी लस घेण्याआधी एकदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी लस घेतली व लस घेतल्यानंतर कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. अशाप्रकारे त्यांनी तीन वेळा कोरोनाशी सामना केला.

- Advertisement -

 

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होण्याचा धोका हा ४.५ टक्के इतका आहे. १०२ दिवसांनी पुन्हा कोरोना झाला तर तो नवीन संसर्ग मानला जातो. त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन असे म्हणतात. दिल्लीतील त्या डॉक्टरला तिसऱ्यांदा त्यांनी कोरोनाची पुष्टी करण्यासाठी RT-PCR चाचणी करण्यात आली त्यात त्यांच्या सीटी काउंट कमी होऊन संसर्गाचे प्रमाण वाढले होते. लस घेऊनही तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला होता.

- Advertisement -

हेही वाचा – India Corona Update: गेल्या २४ तासांत ४४,२३० नव्या बाधितांची नोंद; ५५५ जणांचा मृत्यू

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -