Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर अर्थजगत आयकर विभागाच्या देशभरात ४२ ठिकाणी धाडी; कोट्यवधींचं घबाड सापडलं

आयकर विभागाच्या देशभरात ४२ ठिकाणी धाडी; कोट्यवधींचं घबाड सापडलं

Related Story

- Advertisement -

आयकर विभागाने मंगळवारी देशभरातील पाच राज्यांत विविध ठिकाणी धाडी टाकून एका मोठ्या बोगस बिलिंग नेटवर्कचा पर्दाफाश केला. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा राज्यात ४२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत ५०० कोटीहून अधिकच्या व्यवहाराचे दस्तऐवज अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) सांगितले की, या छापेमारीत तब्बल २.३७ कोटींची रोकड आणि २.८९ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. १७ बँक लॉकरचाही तपशील या कारवाईदरम्यान आढळून आला आहे. मात्र त्याची अद्याप शोध घेतलेला नाही. सीबीडीटी (CBDT – Central Board of Direct Taxation) हा आयकर विभागाचे एक प्रशासकीय प्राधिकरण आहे. त्यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली.

शेल (बोगस) कंपन्याच्या आधारे काळ्या पैशाला अधिकृत करणे, हवालाच्या माध्यमातून पैसे वळवणे अशी कामे करुन देणाऱ्या एंट्री ऑपरेटर संजय जैन या व्यक्तिच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. एंट्री ऑपरेशन चालिवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे या कारवाईनंतर सांगण्यात येत आहे. सीबीडीटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवाला रॅकेट चालविणारे आरोपी मुख्य शहरांतील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत होते. तसेच त्यांच्याकडे शेकडो कोटींची रोकडही जमा आहे. पुढील काही दिवसांत ५०० कोटींच्या हिशोबाबातची चौकशी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

छापेमारीत मिळालेली रक्कम ही Accommodation Entries च्या माध्यमातून लपविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. Accommodation Entries द्वारे मोठ्या रकमेला छोट्या छोट्या हिस्स्यामध्ये वाटून त्याच्या एंट्रीज केल्या जातत, अशी माहिती मनीकंट्रोल संकेतस्थळाने दिली आहे. बोगस बिलांच्या आधारे काळ्या पैशाला पांढऱ्या पैशात रुपांतर करण्याचे काम या एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून होत असते.

- Advertisement -