घरदेश-विदेशस्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता - कमल हसन

स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता – कमल हसन

Subscribe

गांधीजींची हत्या झाली आणि त्याचा न्याय मागण्यासाठी मी इथे आलो आहे

अरिवाकुरुची येथे १९ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघातील आपल्या पक्षाच्या प्रचारसभेत हसन यांनी एक वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले. दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे संस्थापक आणि अभिनय क्षेत्राकडून राजकारणाकडे वळलेल्या कमल हसन यांनी, ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता,’ असे वादग्रस्त विधान रविवारी त्यांनी केले.

तसेच, ‘स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा एक हिंदू होता आणि तो म्हणजे नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधी यांना मारले होते. इथे मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असेही हसन म्हणाले. ‘कमल हसन यांच्या या केलेल्या खळबळजनक वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisement -

‘प्रचार सुरू असताना या संपूर्ण भागात मुस्लिम असल्याने आपण असे विधान करत आहे, असे आपल्याला वाटेल परंतु तसे नाही. यापीर्वीही हेच विचार व्यक्त केले होते’, असे कमल हसन यांचे म्हणणे होते.यासोबतच गांधीजींची हत्या झाली आणि त्याचा न्याय मागण्यासाठी मी इथे आलो आहे. मी सच्चा भारतीय आहे आणि देशात शांतता आणि समानता प्रस्थापित व्हावी हे कोणत्याही भारतीयाला वाटतं. माझाही तोच प्रयत्न आहे, असं सांगतानाच तिरंगा ध्वजच भारताचा राष्ट्रीय ध्वज राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -