घरदेश-विदेशभारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी संबंध चांगले - लष्कर प्रमुख

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी संबंध चांगले – लष्कर प्रमुख

Subscribe

चीन सीमेवर परिस्थिती नियंत्रणात आहे, असं लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणाले.

गेले काही दिवस भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण होतं. मात्र, सीमेवरील तणाव कमी झाला आहे. भारत-चीन सीमेवरची परिस्थिती नियंत्रणात आहे, असं भारताचे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी सांगितलं. चीन आणि भारत यांच्यात सैन्य पातळीवर संवाद सुरु आहेत आणि वाटाघाटीच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारचे विवादित प्रश्न सोडविण्यास सक्षम आहोत, असं देखील ते म्हणाले. देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, चीन सीमेवर परिस्थिती नियंत्रणात आहे. ते म्हणाले की चीनबरोबर अनेक स्तरांवर वाटाघाटी सुरू आहेत. याची सुरूवात कमांडर लेव्हल चर्चेने झाली आणि त्यानंतर कमांडर लेव्हल दोन्ही बाजूंनी चर्चा झाली. याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. लष्करप्रमुख म्हणाले की या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी माघार घेतली आहे आणि आम्हाला आशा आहे की सततच्या चर्चेतुन भारत आणि चीनमधील जे काही सीमारेषेवर वाद आहेत ते सोडवू शकतो. ते म्हणाले की सीमेवरील प्रत्येक गोष्ट नियंत्रणात आहे.


हेही वाचा – मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या बदलीसाठी काँग्रेस नेते आग्रही

- Advertisement -

शुक्रवारी गॅलवान प्रांतावर भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. मेजर जनरल लेव्हलच्या या चर्चेत गॅलवान प्रदेशातील तणाव कमी करण्यावर चर्चा झाली. भारत आणि चीन यांच्यातील चर्चा ६ जूनपासून सुरू झाली. भारताचं नेतृत्व लेफ्टिनेंट हरिंदर सिंग यांनी केलं. तर मेजर जनरल लियू लिन चीनच्या वतीने चर्चेत सहभागी होते. या चर्चेनंतर गॅलवान प्रदेशातील दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली. शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस बिपिन रावत आणि तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांशी बैठक घेतली आणि सीमेवरील परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला.

नेपाळशी मजबूत संबंध

लष्कर प्रमुख नरवणे म्हणाले की, नेपाळशी आमचे मजबूत संबंध आहेत. नेपाळशी आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. एवढेच नव्हे तर दोन्ही देशांमधील लोकांशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते म्हणाले की नेपाळपूर्वीही आमचे संबंध चांगले होते आणि पुढेही राहतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -