India Corona Update: देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत 20 टक्क्यांनी घट; मात्र मृतांची संख्या 1 हजार पार

देशातील दररोज आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 11.69 टक्के झाला आहे.

देशातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत असून गेल्या 24 तासात 2 लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोना मृतांच्या संख्येत आज लक्षणीय वाढ झाली आहे. यात आज 1 लाख 67 हजार 059 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत 20 टक्क्यांनी घट झालीय तर संक्रमणाचा दर 15.7 वरून घसरून 11.6 टक्क्यांवर पोहचला आहे.

भारतात कोरोना रुग्मसंख्या कमी होत असली तरी सलग चौथ्या दिवशी मृतांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे देशासाठी ही चिंताजनक बाब आहे. देशात सोमवारी 959 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर शनिवारी 871 रुग्णांनी आपला जीव गमावला. मात्र हाच आकडा आता 1 हजार 192 वर पोहचला आहे.

दरम्यान मंगळवारी देशात 1.67 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली होती हीच संख्या सोमवारी 2.09 लाख झाली होती. यापूर्वी रविवारी 2,34,281 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याच वेळी, शनिवारी कोरोनाचे 2,35,532 रुग्ण नोंदवले गेले. भारतात सोमवारच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण 20.4 टक्क्यांनी कमी झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाचे 4,14,69,499 रुग्ण आढळले आहेत.

राज्यांची स्थिती काय आहे?

भारतातील 5 सर्वाधिक संक्रमित राज्यांची नोंद झाली आहे. यात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 42,154 रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी कर्नाटकात 24,172, तामिळनाडूमध्ये 19,280, महाराष्ट्रात 15,140 आणि मध्य प्रदेशात 8,062 रुग्णांची नोंद करण्यात आली. या 5 राज्यांमध्ये देशात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 65.13 टक्के रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्याचवेळी एकट्या केरळमध्ये 25.23 टक्के रुग्ण नोंदवले गेलेय.

कोरोनाच्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या घटली

भारतातील कोरोना रिकव्हरी रेट दर 94.6 टक्क्यांवर वर गेला आहे. गेल्या 24 तासात देशात 2,54,076 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 3,92,30,198 बरे झाले आहेत . देशातील अॅटिव्ह रुग्णांची संख्या 17,43,059 वर गेली आहे. हे प्रमाण आता 4.20 टक्के झाले आहे. गेल्या 24 तासात देशातील अॅटिव्ह रुग्णांमध्ये 88,209 ने घट झाली आहे. देशात आतापर्यंत 1,66,68,48,204 लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील दररोज आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 11.69 टक्के झाला आहे.


 

Union Budget 2022 : यंदाही बजेट असणार पेपरलेस; जाणून घ्या अर्थमंत्र्यांच्या भाषणाला केव्हा होणार सुरुवात?