घरदेश-विदेशLive Update: दिल्लीत विरोधकांची उद्या पुन्हा बैठक होणार

Live Update: दिल्लीत विरोधकांची उद्या पुन्हा बैठक होणार

Subscribe

दिल्लीत विरोधकांची उद्या पुन्हा बैठक होणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले आहेत. सोनिया गांधींच्या १० जनपथ या निवासस्थानी दोघांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला राहुल गांधी, संजय राऊत, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थितीत आहेत.

- Advertisement -

पुण्यातील पहिली ते सातवीचे वर्ग १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबईतल्या मालाडमधील अथर्व कॉलेजमध्ये भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहे. माहितीनुसार अथर्व इंडिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगी मागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.


ओबीसी राजकीय आरक्षणावरील पुढील सुनावणी उद्या


मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर, पेपर फुटीची ही पहिली वेळ नाही, निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा गोंधळ?, लॉकडाऊन, नोटाबंदीमुळे व्यावसायिकांनी देश सोडला, ठाकरे सरकार पडेल असे वाटत नाही- राज ठाकरे


भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबनाला स्थगिती देण्याच सर्वोच्च न्यायालयाचा नकार


मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र,


करिना, आम्रितापाठोपाठ महीप कपूरलाही कोरोनाची लागण


राहुल गांधींच्या मुंबईच्या शिवाजी पार्कमधील २८ डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या परवानगीसाठीची याचिका मागे, राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह, भाई जगताप यांनी घेतली याचिका मागे,


अकोला,विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल यांना प्रमाणपत्र देण्यात आले.


बावनकुळे 176 मतांनी विजयी तर खंडेलवाल 110 मतांनी विजयी


अकोला विधान परिषद अपडेट्स

वसंत खंडेलवाल- भाजपा-४४३

गोपीकिशन बाजोरिया-शिवसेना-३३४

बाद मते-३१

मतमोजणी पूर्ण


नागपूरात भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यातून वसंत खंडेलवाल विजयी, ६ पैकी ४ जागा भाजपाच्या पारड्यात


नागपूरात भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी


अकोल्यातून भाजपाचे वसंत खंडेलवाल आघाडीवर


नागपूरातील चंद्रशेखर बावनकुळे पहिल्या मतमोजणीत आघाडीवर,


महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जागांवरील मतमोजणी आज होणार आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला वाशिम बुलडाणा मध्ये गोपीकिशन बाजोरिया यांचे भवितव्य आजच्या निकालावरून निश्चित होणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -