घरताज्या घडामोडीभारताचा नवा विक्रम! अरब राष्ट्रांना अन्न पुरवठा करण्यात भारताचा पहिला क्रमांक

भारताचा नवा विक्रम! अरब राष्ट्रांना अन्न पुरवठा करण्यात भारताचा पहिला क्रमांक

Subscribe

भारत हा कृषीप्रधान देश आहे. तसेच भारतातून अनेक देशांना विविध प्रकारचा शेतमाल पुरवला जातो. तसेच संकाटच्या वेळी भारत देश कायम अग्रस्थानी राहीला आहे. परंतु भारतानं एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तो म्हणजे तब्बल १५ वर्षानंतर अरब राष्ट्रांना अन्न पुरवठा करणारा भारत देश पहिल्या क्रमाकांवर आहे. भारतानं आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. अरब राष्ट्र गुंतवणूक आणि व्यावसायिकांच्या दृष्टीने व्यापार भागीदारांपैकी एक आहे. अरब राष्ट्रांना अन्न पुरवठ्याच्या बाबतीत मागील १५ वर्षांपासून ब्राझील आघाडीवर होतं. मात्र, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे ब्राझीलला मोठा फटका बसला आहे.

कोरोना विषाणूसारख्या मोठ्या संकटाला बळी न पडता. त्यावर मात करत भारताने अरब राष्ट्रांना अन्नपुरवठा करत पहिला क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कृषी व्यवसाय उत्पादनांपैकी ८.१५ टक्के ब्राझीलचा वाटा होता. तर भारताचा वाटा ८.२५ टक्के नोंदवला गेला आहे. २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या महामारीमुळे व्यापारी अडचणीत सापडले होते. त्यामुळे यामध्ये चांगली कामगिरी करत १५ वर्षानंतर भारताने लीग ऑफ अरब राज्यांना अन्न निर्यातीत ब्राझीलला मागे टाकले आहे.

- Advertisement -

सर्वात जास्त महत्त्वाच्या व्यापारी भागादारांपैकी ब्राझील राष्ट्र अग्रस्थानावर समजलं जातं. परंतु जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे जागतिक लॉजिस्टीक्समध्ये गोंधळ घातल्यानंतर हा मार्केटपासून ब्राझील दूर होत गेला. त्याचाच फायदा भारताला झाला. गेल्या वर्षी २२ लीग सदस्यांनी आयात केलेल्या एकूण कृषी व्यवसाय उत्पादनांपैकी ८.१५ टक्के वाटा हा फक्त ब्राझीलचा होता. त्यामध्ये भारताने व्यापारात ८.२५ टक्के हिस्सा मिळवला होता. ब्राझीलनंतर भारत , तुर्की, फ्रान्स , अर्जेंटिना आणि इतर देश पारंपारिक शिपिंग मार्गांच्या व्यत्ययामुळे निर्यातदारांपुढे मागे टाकत चालला आहे.

सौदी अरेबियाला ब्राझिलियन शिपमेंट्समध्ये पहिले ३० दिवसात पुरवठा व्हायचा आणि आता ६० दिवस लागत आहेत. तर भारताची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती पाहता फळे, भाजीपाला आणि धान्य कमी वेळात आणि आठवड्याभरात पाठवू शकला आहे. भारताच्या भौगोलिक परिस्थितीमुळे ते फळे, भाज्या, साखर, धान्य आणि मांस आठवड्यातून कमी वेळात पाठवण्यात यशस्वी ठरला आहे.

- Advertisement -

हेही वाचा: Omicron Variant : ५ ते १४ वयोगटातील मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका, WHO चा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -