घरदेश-विदेशभारतात 2021 मध्ये दररोज 86 बलात्काराची प्रकरणं नोंद, सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये: NCRB...

भारतात 2021 मध्ये दररोज 86 बलात्काराची प्रकरणं नोंद, सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये: NCRB रिपोर्टमधून खुलासा

Subscribe

नवी दिल्ली : भारतात बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही, सरकारकडून कायदे कडक केले जात असतानही आरोपींकडून महिलांच्या चारित्र्याशी खेळ सुरुच आहे. यात नॅशन क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या नवीन अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात 2021 मध्ये बलात्काराच्या एकूण 31,677 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. म्हणजेच 2021 मध्ये दररोज सरासरी 86 बलात्काराच्या घटनांची नोंद होत होती. त्याचवेळी त्यावर्षी दर तासाला सुमारे 49 महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या NCRB ने नुकताच ‘क्राइम इन इंडिया 2021’ अहवाल जाहीर केला. ज्यात 2020 मध्ये 28,046 बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले, तर 2019 मध्ये 32,033 गुन्हे नोंदवले गेले आहेत. यात 2021 मध्ये, राजस्थानमध्ये सर्वाधिक म्हणजेच 6,337 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे, त्या पाठोपाठ मध्य प्रदेशात 2,947, महाराष्ट्रात 2,496, उत्तर प्रदेशात 2,845, दिल्लीत 1,250 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

अहवालानुसार, 2021 मध्ये देशभरात एकूण 4,28,278 महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, गुन्ह्यांचे प्रमाण (प्रति लाख लोकसंख्येमागे) 64.5 टक्के आहे. अशा गुन्ह्यांमध्ये 77.1 टक्के प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. आकडेवारीनुसार, २०२० मध्ये देशभरात 3,71,503 आणि 2019 मध्ये 4,05,326 महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली.

NCRB नुसार, उत्तर प्रदेशमध्ये 2021 मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची सर्वाधिक 56,083 प्रकरणे नोंदवली गेली. यानंतर, राजस्थानमध्ये 40,738, महाराष्ट्रात 39,526, पश्चिम बंगालमध्ये 35,884 आणि ओडिशामध्ये 31,352 प्रकरणे नोंदवण्यात आली.


मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार, नारायण राणेंचा विश्वास

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -