घरताज्या घडामोडीभारताने केली 'Pralay Missile'ची यशस्वी चाचणी ; मिसाइल १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे...

भारताने केली ‘Pralay Missile’ची यशस्वी चाचणी ; मिसाइल १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार

Subscribe

भारताने बुधवारी बॅलिस्टिक मिसाइल ‘प्रलय’ची यशस्वी चाचणी केली आहे. या मिसाइलमध्ये १५० ते ५०० किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या मिसाइलचे परीक्षण ओडिसाच्या किनाऱ्यावर करण्यात आले.  डिआरडीओने गेल्या काही महिन्यात अनेक मिसाइलची चाचणी करण्यात यश मिळवले.डीआरडीओने ओडिसाच्या किनारपट्टीवरील चाचणी केंद्रावरुन डिसेंबर महिन्यात ‘अग्नी-५’ सह आणि अनेक बॅलिस्टिकसह क्रुज मिसाइलची यशस्वी चाचणी केली.या प्रलय मिसाइलची अब्दुल कलाम व्दिप येथून सकाळी साडेदहा वाजता यशस्वी चाचणी करण्यात आली. हे मिसाइल जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्यासाठी सक्षम आहे. याची पेलोड क्षमता ही ५०० ते १,००० किलोग्राम इतकी आहे.यामुळे हे मिसाइल युद्ध क्षेत्राच्या काळात दुश्मनाला नेस्तनाबूत करेल.

- Advertisement -

या मिसाइलचा उल्लेख डीआरडीओने २०१५ साली केला होता.त्यांनी त्यांच्या वार्षिक रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, हे बॅलिस्टिक प्रलय मिसाइल चीनच्या बॅलिस्टिक मिसाइलचा सामना करण्यास सक्षम आहे.या मिसाइलमध्ये शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्या लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्याची क्षमता आहे.प्रलय मिसाइलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे मिसाइल अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, ही काळाची गरज आहे.कारण शत्रू जर पूर्ण ताकदीने अत्याधुनिक उपकरणे वापरत असेल तर, शत्रूवर मात करण्यासाठी भारतानेही तंत्रज्ञानाची साथ देत सुसज्ज होणे गरजेचे आहे.या मिसाइलच्या यशाबाबत संरक्षण मंत्री रामनाथ सिंह यांनी डीआरडीओचे आणि संपूर्ण टीमचे ट्विट् करत अभिनंदन केले.

- Advertisement -

हे ही वाचा – Kartik Aaryan: रणवीर सिंह अन् शाहिद नंतर कार्तिक आर्यन बनला क्रिकेटर, नव्या सिनेमाची चर्चा


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -