घरदेश-विदेशचीनला सडेतोड उत्तर, 'हा' देश भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार

चीनला सडेतोड उत्तर, ‘हा’ देश भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार

Subscribe

चीनमुळे त्रस्त असणाऱ्या व्हिएतनामला भारताचे सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा आहे.

चीनमुळे त्रस्त असणाऱ्या व्हिएतनामला भारताचे सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा आहे. चीनच्या तणावादरम्यान भारत आणि व्हिएतनाम यांची मैत्री अशाप्रकारे पुढे जात आहे, जशी भारताला घेरण्यासाठी चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहे. दरम्यान व्हिएतनामला भारतातील सर्वात धोकादायक ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घ्यायचे आहे. या क्षेपणास्त्रास रशिया आणि भारत यांनी एकत्रित तयार केले आहे, त्यामुळे हे क्षेपणास्त्र रशियाच्या संमतीमुळे कोणत्याही तिसर्‍या देशाला दिले जात नव्हते. आता रशियाने या क्षेपणास्त्र निर्यातीला परवानगी दिली आहे, त्यामुळे व्हिएतनामला ब्रह्मोस मिळाल्यानंतर चीनला दक्षिण चीन समुद्रात थोडे सावधानतेने राहावे लागणार आहे.

रशियाने भारताबरोबर संरक्षण सहकार्याने दोन मोठे पुढाकार घेतले आहेत. रशियाच्या सरकारने ब्रह्मोस या भारताच्या भागीदारीत बनविलेले सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र तिसर्‍या देशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, रशियन संरक्षण कंपन्यांच्या १०० कंपन्यांची यादी जाहीर केली असून, त्यांना ब्रह्मोस सारखा प्रकल्प भारताबरोबर सुरू करायचा आहे.

- Advertisement -

व्हिएतनामने देखील आकाश एअर डिफेन्स क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पात रशियाची ५० टक्के भागीदारी असल्याने या क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी त्याची परवानगी आवश्यक होती. जर एखादा करार झाला तर व्हिएतनाम आपल्या देशाच्या रक्षणासाठी ही दोन्ही क्षेपणास्त्र तैनात करणार आहे.

हायड्रोकार्बनचा एक प्रमुख स्त्रोत असलेल्या दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला दावा करतो. तर व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई यासह आशियाची अनेक सदस्य देश उलटसुलट दावा करत आहेत. गेल्या आठवड्यात व्हिएतनामचे राजदूत फाम सान्ह चाऊ यांनी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांना दक्षिण चीन समुद्रात वाढलेल्या तणावाची माहिती दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळासह बहुस्तरीय मंचावर घनिष्ठ समन्वय स्थापित करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.


अन्यथा पुढील ५० वर्षे काँग्रेस विरोधातच बसेल; गुलाम नबी आझाद यांचा पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -