घरमहाराष्ट्रकाँग्रेसचे JEE-NEET परीक्षेविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन

काँग्रेसचे JEE-NEET परीक्षेविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकारने JEE NEET परिक्षांची घोषणा केल्यामुळे विरोधी पक्षातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम असून काँग्रेसने मात्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर काँग्रेस जेईई-नीट परीक्षेविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई आणि नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची चिंता सतावत आहे. असे असताना मोदी सरकार मात्र परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भूमिकेला आमचा विरोध आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले बाळासाहेब

ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. असं असताना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही अजून झालेली नाही. जेईई परिक्षेसाठी तब्बल साडेआठ लाख विद्यार्थी बसलेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यास एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

विठुरायाच्या चरणांवर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -