घरदेश-विदेशइंडियन एअऱफोर्सचे हेलिकॉप्टर उतरले शेतात

इंडियन एअऱफोर्सचे हेलिकॉप्टर उतरले शेतात

Subscribe

गावातल्या बघ्यांची मोठी गर्दी

इंडियन एअरफोर्सच्या एका हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे आज दुपारी उत्तर प्रदेशातील एका शेतात प्रतिबंधात्मक असे लॅण्डिंग करावे लागले. एअऱफोर्सच्या प्रशिक्षण सरावा दरम्यान ही घटना घडली आहे. पण हेलिकॉप्टर शेतात उतरल्यानंतर मात्र गावात एकच गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी हॅलिकॉप्टर पाहण्यासाठी एकाचवेळी जमली. उतर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये ही घटना आज दुपारी घडली आहे.

- Advertisement -

एअरफोर्सच्या ताफ्यातील ध्रुव या सर्वात हलक्या हेलिकॉप्टरवर प्रतिबंधात्मक लॅण्डिंग करण्याची वेळ आज दुपारी आली. हेलिकॉप्टरचे नियमित असे प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरचे लॅण्डिंग अतिशय सुरक्षितपणे झाले आहे. तसेच एअऱफोर्सच्या क्रू मार्फत अतिशय जलद अशा स्वरूपाची कारवाई यावेळी करण्यात आली. त्यामुळे घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही, तसेच कोणतीही जिवितहानी झाली नाही असे एअऱफोर्सच्या वतीन सांगण्यात आले.

एअरफोर्सच्या एडव्हान्स अशा हेलिकॉप्टरने सरसावा या एअरफोर्सच्या स्टेशनपासून नेहमीच्या प्रशिक्षणासाठी आज झेप घेतली. पण जवळपास ३० नॉटिकल माईल्सवर काही तांत्रिक कारणास्तव या हेलिकॉप्टरला लॅण्डिंग करावे लागले. या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही असे इंडियन एअरफोर्सने स्टेटमेंटमध्ये जाहीर केले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या भागात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -