घरदेश-विदेशInd v/s China : भारतीय सैनिकांनी LAC च्या सहा प्रमुख टेकड्यांवर ताबा...

Ind v/s China : भारतीय सैनिकांनी LAC च्या सहा प्रमुख टेकड्यांवर ताबा मिळवला

Subscribe

मागील तीन आठवड्यात भारतीय सैनिकांनी चीनलगत लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल LAC सीमेच्या सहा प्रमुख टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. सध्या चीनच्या सैनिकांसोबत लडाखच्या सीमेवर भारतीय लष्करांमध्ये संघर्ष सुरू असताना भारतासाठी हे मोठे यश समजले जात आहे. पूर्व लडाख भागात भारत – चीन सीमेवर गेल्या २० दिवसांपासून दोन्ही सैनिकांमध्ये चढाओढ सुरू होती. भारतीय सैनिकांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सर्व कारवाया हाणून पाडल्या. त्यांनी सहा ठिकाणी ताबा मिळवत चीनला चीतपट केले.

- Advertisement -

चीनी सेना भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्यासाठी टेकड्यांवर ताबा मिळवू पाहत होती. मात्र भारतीय लष्कराने असे होऊ दिले नाही. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जवानांनी सहा मुख्य टेकड्यांवर ताबा मिळवला असून यामध्ये मागर हिल, गुरुंग हिल, रेजांग ला, राचाना ला, मोखपारी आणि फिंगर ४ रिज लाईन सारख्या पर्वतांचा समावेश आहे. या पर्वतरांगा दक्षिणपासून उत्तरेपर्यंत पसरलेल्या आहेत. भारताने मिळवलेल्या यशामुळे चीनसमोर आपली ताकद आणखीनच वाढली आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये २९ ऑगस्टनंतर LAC सीमेवर संघर्ष सुरू झाला होता. तर चीनच्या सैनिकांनी पँगाँग नदीजवळील थाकुंग क्षेत्रात दक्षिणच्या दिशेने पर्वतावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा –

कृषि विधेयक आल्यावर शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबतील का?; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -