घरदेश-विदेशनाताळच्या रात्री कर्तव्यावर असताना भारतीय पोलीस अधिकाऱ्याची हत्या

नाताळच्या रात्री कर्तव्यावर असताना भारतीय पोलीस अधिकाऱ्याची हत्या

Subscribe

कॅलिफोर्निया पोलीस विभागात कार्यरत असलेला भारतीय वंक्षाचा रोनील सिंगची हत्या करण्यात आली आहे. नाताळच्या रात्रीच काही अज्ञात इसमांनी गोळी झाडून त्याची हत्या केली. मृत्यूच्या काही तासापूर्वीच शेअर केले होते कुटुंबीयांबरोबरचे फोटो.

कॅलिफोर्निया पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका भारतीय वंक्षाच्या पोलीस अधिकाऱ्याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. ही घटना नाताळच्या रात्री घडली आहे. रोनील सिंग (३३) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यू पश्चात त्याची पत्नी अनामिका आणि पाच महिन्याचा मुलगा असे कुटुंब आहे. रोनील  २०१० पासून कॅलिफोर्नि पोलीस दलात कार्यरत आहे. त्यांच्या मृत्यूचा त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेत गुन्हा नोंदवला असून आरोपींचा तपास सुरु केला आहे. रोनीलला श्रद्धांजली म्हणून कॅलिफोर्निया पोलिसांनी ट्विटवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.


कसा घडला प्रकार 

रोनील सिंगला नाताळच्या दिवशी अधिक वेळ काम करावे लागले होते. त्यादिवशी घरातून निघाल्यानंतर रोनीत रस्त्यावर धावत असलेल्या गाड्यांवर लक्ष ठेवत होता. रोनीलला एक गाडी संक्षयास्पद वाटली. त्याने या गाडीला थांबण्याचे आदेश दिले. गाडी थांबवल्यावर रोनीलने चालकाला ओळखपत्र मागीतले मात्र घाबरलेल्या चालकाने रोनीलवर गोळी झाडली व घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर रोनीलला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. पोलिसांनी सीसीटीवीच्या आधारावर या संक्षयीत आरोपीचे फोटो प्रसारित केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -