घरताज्या घडामोडीIndian Railway : रेल्वेने आज रद्द केल्या ३३५ ट्रेन ; ३० ट्रेनच्या...

Indian Railway : रेल्वेने आज रद्द केल्या ३३५ ट्रेन ; ३० ट्रेनच्या मार्गात बदल

Subscribe

भारतीय रेल्वेने आज गुरुवारी २३ डिसेंबरला ट्रेनच्या वेळापत्रकात थोडा बदल केला आहे. भारतीय रेल्वेने आज एकूण ३३५ ट्रेन रद्द केल्या आहेत. ज्यामध्ये २८३ ट्र्रेन पुर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, त्यापैकी ५२ ट्रेन थोड्याच प्रमाणात रद्द करण्यात आल्या आहेत.भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट equiry.indianrail.gov.in नुसार,३० ट्रेनच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. याशिवाय रेल्वेने ४ ट्रेनच्या वेळेमध्ये बदल केला आहे.दररोज भारतीय रेल्वे ट्रेन ही रद्द होणाऱ्या ट्रेनची यादी जाहीर करते. ज्यामध्ये कोणती ट्रेन कोणत्या कारणासाठी रद्द झाली याची संपूर्ण माहिती देण्यात येते.याशिवाय किती ट्रेन रद्द झाल्या आहेत,याबाबत पुरेपुर माहिती देण्यात येते.या रद्द झालेल्या ट्रेनमध्ये एक्सप्रेस,पॅसेंजर ट्रेन आणि विशेष गाड्यांबद्दलची माहिती देण्यात येते.त्यामुळे तुम्ही कुठेही प्रवास करत असाल तर, नेहमी भारतीय रेल्वेने रद्द केलेल्या या ट्रेनची यादी तपासणे सोयीचे ठरेल.

रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमांत मोठा बदल

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनदरम्यान भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासावर अनेक निर्बंध लागू केले होते. मात्र रेल्वे या नियमांत आता सतत बदल करत आहे. यापूर्वी रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी पूर्ण पत्ता आणि पिन कोड अनिवार्य करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा हे नियम बदलले आहेत. हे नियम सर्व गाड्यांना लागू नसतील मात्र काही ठरावीक गाड्यांना लागू होणार आहेत. विशेषत: झारखंड, बिहारच्या रेल्वे प्रवाशांसाठी ही दिलासाजनक बाब आहे. या राज्यांतील काही गाड्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी संपूर्ण पत्त्याची अट रेल्वेने काढून टाकली आहे.याशिवाय कोरोनाच्या सावटामुळे रेल्वेने लांबच्या पल्ल्यावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लादले होते.रिझर्वेशनशिवाय ट्रेनने प्रवास करु शकत नव्हते मात्र, आता भारतीय रेल्वेने काही नियम व अटी लादत प्रवासावरील निर्बंध शिथिल केले आहेत.आत प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्याकडून आदित्य ठाकरेंना धमकी, पोलिसांनी केली अटक


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -