घरदेश-विदेशभारत-चीन तणाव: लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ११ तास बैठक; भारताने स्पष्ट शब्दांत सुनावलं

भारत-चीन तणाव: लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ११ तास बैठक; भारताने स्पष्ट शब्दांत सुनावलं

Subscribe

भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी कोर कमांडर पातळीवर चर्चा झाली.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांच्यात सोमवारी कोर कमांडर पातळीवर चर्चा झाली. एलएसीच्या दुसऱ्या बाजूला चीनच्या मोल्दो भागात दोन सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. सुमारे ११ तासांनंतर बैठक संपली. मंगळवारी देखील बैठक होण्याची शक्यता आहे.

भारत आणि चीनी सैन्य यांच्यात गेल्या आठवड्यात गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव कमी करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये कोर कमांडर पातळीवर बैठक पार पडली. या बैठकीत भारताने चीनला सैन्या मागे घ्या, असं सांगितलं. देशाच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने पूर्व लडाखमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. गेल्या आठवड्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० भारतीय लष्करी जवान शहीद झाले. पूर्वेकडील लडाखमधील चुशुल सेक्टरच्या चिनी भागात असलेल्या मोल्दो येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास ही बैठक सुरू झाली.

- Advertisement -

हेही वाचा – भारत-चीन तणाव: लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे आज लेहचा दौरा करणार


गलवान खोऱ्यात हिंसक चकमकींनंतर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांची ही बैठक आयोजित केली जात आहे. यापूर्वी सोमवारी चीनच्या नियंत्रणाचा भाग असलेल्या मोल्दो येथे बैठक झाली होती तेव्हा भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं की चीन ५ मे आधी ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी चीनने परत जावं. लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं. तर चीनच्या वतीने मेजर जनरल लियू लिन हे होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -