घरताज्या घडामोडीभारत-चीनी सैनिक पुन्हा भिडणार?

भारत-चीनी सैनिक पुन्हा भिडणार?

Subscribe

गेल्या ४५ वर्षांत भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू पहिल्यांदाच अशी घटना घडली.

गलवान खोऱ्यात १५ जूनला रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाले. त्याचप्रमाणे चिनचेही ४० सैनिकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.

गेल्या ४५ वर्षांत भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू पहिल्यांदाच अशी घटना घडली. गलवान खोऱ्यातील घटनेमुळे या कराराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी १९९३ मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे.

- Advertisement -

घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते

जर सैन्यमाघारीची प्रक्रिया जलद गतीने पार पडली नाही, तर गलवानमधील घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक असते. एखादी लहानशी घटनाही संघर्षांची ठिणगी टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकते.’’ अशी माहिती माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी दिली.


हे ही वाचा – पुणेकरांची चिंता वाढली, २४ तासात ८२३ कोरोनाचे नवे रूग्ण, तर पिंपरी-चिंचवडमध्ये…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -