घरताज्या घडामोडीRahul Bajaj Passes Away: बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन; ८३व्या...

Rahul Bajaj Passes Away: बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन; ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं पुण्यात निधन झालं आहे (Industrialist Rahul Bajaj passes away at 83). वयाच्या ८३व्या वर्षी राहुल बजाज यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी ११ पासून आकुर्डीतील कंपनीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्याच वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान राहुल बजाज यांच्या जाण्याने बजाज ग्रुपचा आधारस्तंभ हरपला आहे. त्यांनी पाच दशकं बजाज ऑटो समूहाचं नेतृत्व केलं होत. तसेच बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. २००१ मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. पण गेल्या काही काळापासून राहुल बजाज आजारी होते. तसेच बजाज समुहाचं जो दैनंदिन कारभार आहे, त्यापासून सुद्धा ते गेल्या बऱ्याच वर्षांपासून अलिप्त होते.

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली कोलकातामध्ये झाला होता. त्यांनी ६०च्या दशकात बजाज समूहाचे नेतृत्व स्वीकारले. २००५ साली त्यांनी आपले अध्यक्षपद सोडले आणि त्यानंतरपासून सुपुत्र राजीव बजाज यांनी ही जबाबदारी सांभाळली.

- Advertisement -

राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यांनी दिल्ली महाविद्यालयातून अर्थशास्त्रामध्ये ऑनर्स डिग्री, मुंबई महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले होते. २००८मध्ये त्यांनी बजाज ऑटोचे तीन युनिटमध्ये विभाजन केले होते. यामध्ये बजाज ऑटो, फायनन्स कंपनी बजाज फिनसर्व्ह आणि एक होल्डिंग कंपनीचा समावेश आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान एक उद्योगपती आणि महात्मा गांधींचे प्रमुख समर्थक जमनालाल बजाज यांचे सुपुत्र राहुल बजाज होते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -