घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत पाच ठिकाणी सीबीआयची छापेमारी

Live Update: मुंबईत पाच ठिकाणी सीबीआयची छापेमारी

Subscribe

बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयने मुंबईतील पाच ठिकाणी छापेमारी केली आहे.


राहुल बजाज यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान – शरद पवार

- Advertisement -

मुंबई इंडियन्सने १५ कोटी २५ लाखात ईशान किशनला घेतले

- Advertisement -

बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन. पुण्यात घेतला अखरेचा श्वास


आयपीएलच्या लिलावाला पुन्हा सुरुवात


आयपीएलच्या लिलावाचे सूत्रसंचालन करणारे ह्युग एडमिड्स भोवळ येऊन कोसळले असल्यामुळे तुर्तास लिलाब थांबवला आहे.


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा डिजिटल जाहीरनामा सादर केला.


सीए, शेअर ट्रेडिंगशी संबंधित प्रकरणी नागपुरात सीबीआयचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. सीए विशाल खटवानी रडारवर आहे. कोराडी ग्रीन लॅवरेज परिसरात छापा टाकला आहे.


नांदेडच्या पुणेगावमधील परमानंद कुटिया मंदिराच्या महंत योगी त्यागीनंद महाराजांचा अपघाती मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात देवदर्शनाला जात असताना मध्य प्रदेशातील कटनी उथं हा भीषण अपघात झाला आहे.


भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची गोव्यातल्या मेरिएट हॉटेलमध्ये भेट घेतली.


आयपॅकच्या विकास नागल याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खोलीत ड्रग्ज सापडल्यामुळे आयपॅकच्या या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ५० हजार ४०७ नव्या रुग्णांची नोंद, १ लाख जण कोरोनामुक्त, तर ८०४ जण मृत्यूमुखी पडले आहेत.


उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सवर सेबीने मोठी कारवाई केली. कंपनीशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी सेबी ही कारवाई केल्याचे समोर आहे आहे. त्यामुळे सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास अनिल अंबानी आणि इतरांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. सेबीकडून अनिल अंबानींसह अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश शाह यांच्यावर कारवाई करण्यात आले आहेत.


उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज कोरोना आढावा बैठक घेणार


आज उत्तराखंडच्या उत्तरकाशीच्या ३९ किमी ई येथे ५ वाजून ३४ मिनिटांनी ISTच्या सुमारास ४.१ तीव्रतेचा भूकंप झाला.


मुंबई उच्च न्यायालयाने विलीनीकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ राज्य सरकारला दिला आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत विलीनीकरणाचा अहवाल सादर करा असे निर्देश उच्च न्यायालने दिले आहेत. आता एसटी विलीनीकरणासंदर्भात २२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.


भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत निलंबन मागे घेतल्याचे सांगताना सभापतींनी विधिमंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील अधिकार कक्षा निश्चित करण्याची विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना करण्यात आल्याची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -