घरदेश-विदेशGoodNews! आंतरराष्ट्रीय विमान सेवा लवकरच होणार सुरू...

GoodNews! आंतरराष्ट्रीय विमान सेवा लवकरच होणार सुरू…

Subscribe

भारत आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी द्विपक्षीय अस्थायी व्यवस्था स्थापित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापुर सह १३ देशांसोबत चर्चा करीत आहेत

देशभर पसरत असणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण सेवा बंद ठेवण्यात आले आहेत. यासह देशातील काही भागातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. असे असले तरी रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सरकारकडून प्रयत्नही केले जात आहे. अशातच एक नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, भारत आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी द्विपक्षीय अस्थायी व्यवस्था स्थापित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापुर सह १३ देशांसोबत चर्चा करीत आहेत. या प्रकारच्या व्यवस्थेमुळे दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांनी काही प्रतिबंधांसह आंतरराष्ट्रीय उड्डाणं संचालित करू शकतात.

- Advertisement -

शेजारील काही देशांना श्रीलंका, बांग्लादेश, अफगनिस्तान, नेपाळ आणि भूतानसह यांच्यासह अशी व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव केले आहे. भारताने जुलैपासून अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनी, यूएई, कतार आणि मालदीवसह अशा प्रकारचे करार केले आहेत. पुरी यांनी ट्विटर सांगितले की, ‘आम्ही आता यापुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही व्यवस्था कायम करण्यासाठी आणखी १३ देशांसोबत बातचीत सुरू असल्याचे पुरी यांनी ट्विट करून सांगितले.

या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, न्यूजीलँड, नायजेरिया, इज्राईल, केनिया, फिलिपिन्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि थायलँड सहभागी आहेत. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे भारतात २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


बाप्पाने रेल्वेला दिली सुबुद्धी; एलटीटी-रत्नागिरी एक्स्प्रेसचे सुपरफास्ट शुल्क काढले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -