घरताज्या घडामोडीखळबळजनक! एकाच कुटुंबात आढळले चौघांचे मृतदेह

खळबळजनक! एकाच कुटुंबात आढळले चौघांचे मृतदेह

Subscribe

नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबात चौघांचे मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे.

प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धीरज राणे (४१), डॉ. सुषमा धीरज राणे (३९), ध्रव धीरज राणे (११), ववन्या धीरज राणे (५) अशी मृतांची नावे असून ते संत जगनाडे सोसायटी कोराडी नाका येथे राहत होते.

नेमके काय घडले?

नागपूरच्या संत जगनाडे सोसायटी कोराडी नाका येथे राहणारे धीरज राणे हे वानाडोंगरी येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. तर नागपूर येथील अवंती रुग्णालयामध्ये त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा राणे कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार; धीरज यांची आत्या प्रमिला (६५) यांनी पाहिले असता सकाळी बराच वेळ होऊनही भाचा, सून आणि नातवांपैकी कुणीच बाहेर दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचे दार ठोठावले. आवाजही दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धीरच्या आईने शेजारच्या किराणा दुकानदारास तसेच ओमनगरात राहणारे सुषमा यांचे बंधू रितेश सिंग यांना माहिती दिली. नंतर पोलिसांना कळविले.

- Advertisement -

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दार तोडल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला कारण घरामध्ये धीरज, धुव्र आणि वन्या यांचे मृतदेह एका खोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या खोलीत इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरिंज आढळून आल्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या. डॉ. सुषमा यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुषमा यांच्यासोबत आपले सोमवारी रात्री १२ च्या सुमारास बोलणे झाले होते, अशी माहिती धीरच्या आईने दिली. राणे दाम्पत्यपैकी एकाने तिघांची हत्या करुन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलावून घेतली आहे.


हेही वाचा – बाप्पाने रेल्वेला दिली सुबुद्धी; एलटीटी-रत्नागिरी एक्स्प्रेसचे सुपरफास्ट शुल्क काढले!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -