घरमनोरंजनFB Live - कशी झाली तृप्ती भोईर अगडबम!

FB Live – कशी झाली तृप्ती भोईर अगडबम!

Subscribe

अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखिका अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री तृप्ती भोईर रुपेरी पडद्यावर जितकी मनमोकळी आणि हसमुख आहेत तितकीच ती खऱ्या आयुष्यातही आहे. माझा अगडबम या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तृप्तीने आपलं महानगरच्या वाचकांशी माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमधून संवाद साधला आहे.

अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखिका अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री तृप्ती भोईर रुपेरी पडद्यावर जितकी मनमोकळी आणि हसमुख आहेत तितकीच ती खऱ्या आयुष्यातही आहे. माझा अगडबम या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तृप्तीने आपलं महानगरच्या वाचकांशी माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमधून संवाद साधला आहे. चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर तृप्तीने उत्तमोत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. तिचा हा मराठी सिनेमांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया.

अभिनेत्री तृप्ती भोईरची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा  

- Advertisement -

जाडजूड, भरपूर खादाड पण तितकीच गोड नाजूका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा नक्कीच आनंद आहे. मात्र ही नाजूका घडवण्यासाठी लागणारी मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे. मेकअपला लागणारा तब्बल साडेपाच तास ४० किलोचा मेकअपचा थर, सलग १२ तास शूटींग आणि मेकअप काढण्यासाठी लागणारा एक तास या शेड्यूलसह ४३ दिवस या चित्रपटाचे शूटींग केले आहे. प्रमुख अभिनेत्रीसह दिग्दर्शक आणि पहिल्यांदा लेखिकेचीही जबाबदारी पार पाडत आहे. हे अजिबात सोपं नव्हतं. कारण काही चार तासानंतर संपूर्ण मेकअप हा निघायला सुरुवात होत होती. ती आईस्क्रीमसारखी वितळत होती. शूटींगचे पहिले १० दिवस बरे गेले, मात्र नंतर शारीरिक त्रास जाणवू लागला. त्वचेचे आजार होऊ लागले. नाजूक जरी अंगाने जाडजूड असली तरी तृप्ती मात्र ६० किलोंचीच आहे. त्यामुळे शरीरावर इतक ओझ घेऊन वावरण सोप नव्हतं. मेकअपमुळे १२ तास मी काहीच खाऊ शकत नव्हते. फक्त लिक्विडवर असायचे, पण युरिन पास होण्यासाठीही अडचणी येऊ लागल्या. अखेर मला युरिन इन्फेक्शन झाले आणि डॉक्टरांनी मला यापुढे किमान २ आठवडेतरी असा मेकअप करू नको, हा सल्ला दिला आहे. अगडबममध्ये नाजूका २५० किलोची होती. मात्र आता माझा अगडबममध्ये ती ३०० किलोची झाली आहे. पहिल्या भागात नवऱ्याने दुर्लक्षित केलेली, घाबरणारी, बिचकणारी नाजूका आता आठ वर्षांनी बिनधास झाली आहे. घरात रुळली आहे. विशेष म्हणजे तिच्या नवऱ्याच तिच्यावर निस्सिम प्रेम आहे.

सुबोध भावेसोबतची केमिस्ट्री

चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता मकरंद अनासपुरे होते तर दुसऱ्या भागात सध्याचे सुपरस्टार सुबोध भावे आहे. मकरंदसोबत जी होती त्याहीपेक्षा उत्तम केमिस्ट्री सुबोधसोबत जुळली आहे. मराठीतील अष्टपैलू अभिनेता म्हणून सुबोधची ओळख असून त्याने मला खुपच सांभाळून घेतले आहे.

- Advertisement -

टुरिन टॉकिजचा भन्नाट अनुभव

अरे संसार संसार या पहिल्या चित्रपटानंतर टुरिन टॉकिज हा चित्रपट बनवला. खरतर हा चित्रपट म्हणजे खऱ्या आयुष्यातील अनुभव होता. पहिल्या चित्रपटासाठी कर्ज घेतले होते. परंतू हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता हा सिनेमा चालवायचा तर होता. त्यासाठी टुरिन टॉकिजचा पर्याय निवडला. टुरिन टॉकिजमध्ये चित्रपट दाखवण्याचा अनुभव खुपच विलक्षण होता. गावाकडच्या लोकांशी संपर्क साधणे, जत्रेमध्ये तब्बल एकावेळी १२ चित्रपट टुरिन टॉकिजमध्ये दाखवले जात असताना आपला सिनेमा कसा पाहिला जाईल, यासाठी शक्कल लढवले. हे अनुभव शब्दात मांडता येणे कठीण आहे. पण या अनुभवांवरच मी टुरिन टॉकिज हा सिनेमा बनवला आणि त्यातील काही वास्तविक दृष्यही चित्रपटात दाखवले. या मेहनतीचा परिपाक म्हणजे हा सिनेमा थेट ऑस्करपर्यंत गेला. खरतर ऑस्करला जाणाऱ्या सिनेमांची जातकुळीच वेगळी असते. आपण ५० कोटी जरी खर्च केले तरी ऑस्करच्या श्रेणीत बसणार नाही. पण ऑस्करच्या वारीत मी स्वतः ३ तीन तंबू ठोकून माझा सिनेमा प्रेक्षकांना दाखवला. दिवसाला तीन-तीन शो या सिनेमाचे केले. त्यावर्षी आपल्या भारतीय सिनेमाला १०० वर्ष पूर्ण झाली होती. ती खऱ्या अर्थाने मी तिथे साजरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -