घरक्राइमIPL : ऐकावं ते नवलंच ! IPL की मालिका वाद रंगला; नवरा...

IPL : ऐकावं ते नवलंच ! IPL की मालिका वाद रंगला; नवरा – बायको पोहोचले पोलीस ठाण्यात

Subscribe

IPL : पत्नी टीव्हीवर आवडती मालिका बघत असताना कामावरून घरी आलेल्या पतीने क्रिकेट मॅच लावली. दोघांनाही आपापले आवडते कार्यक्रम बघायचे होते, पण घरात टीव्ही एकच होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणामुळे बायको थेट माहेरी निघून गेली. आणि तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मग समुपदेशकांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणला.

आग्रा : क्रिकेट आवडत नाही, असा आपल्या देशात कोणी सापडेल, ही शक्यता कमीच. त्यातही सध्या आयपीएल सुरू आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये भलताच जोश आहे. त्यामुळेच रोजची मॅच कोणीच चुकवत नाही. मात्र, याच क्रिकेटच्या प्रेमातून झालेल्या वादातून नवरा – बायको थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. आणि शेवटी पोलिसांना यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा लागला आहे. (IPL husband and wife had an argument over watching the ipl in Agra)

काय आहे प्रकरण? What is the matter?

उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला आहे. पत्नी टीव्हीवर आवडती मालिका बघत असताना कामावरून घरी आलेल्या पतीने क्रिकेट मॅच लावली. दोघांनाही आपापले आवडते कार्यक्रम बघायचे होते, पण घरात टीव्ही एकच होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणामुळे बायको थेट माहेरी निघून गेली. आणि तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मग समुपदेशकांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणला.

- Advertisement -

कुटुंब कल्याण केंद्रातील समुपदेशकांनी समजावल्यानंतर या दोघा नवरा – बायकोतील भांडण संपले. हाथरस येथे राहणाऱ्या या मुलीचे सादाबाद येथील तरुणासोबत लग्न झाले. तिचा पती नोएडातील एका कंपनीत नोकरी करतो. आपल्या नवऱ्याला क्रिकेटचे वेड असल्याची बायकोची तक्रार आहे. आयपीएल सुरू झाल्यानंतर तर तो नोकरीवरून लवकर घरी येत असल्याचे बायकोचे म्हणणे आहे. घरी असल्यावर मोबाईलवर क्रिकेटच्या क्लिप्स बघणे किंवा टीव्हीवर मॅच बघणे, एवढा एकच उद्योग असल्याचे बायको सांगते. मॅच सुरू असेल तर तो जागचा हलतही नाही, जागेवरच तो चहा आणि जेवण मागवत असल्याचे ती सांगते. (IPL husband and wife had an argument over watching the ipl in Agra)

हेही वाचा – Mumbai Indians : मुंबईचा केवळ पहिला विजयच नाही तर, रचला IPLच्या इतिहासातील मोठा रेकॉर्ड

- Advertisement -

बायकोला बघायची होती सिरीयल

नवरा सतत मॅच बघत असल्याने बायकोची पंचाईत झाली. आयपीएल मॅच आणि बायकोच्या सिरिअलची वेळ एकच होती. त्यामुळे तिला टीव्ही पाहता येत नव्हता. या दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. मार्ग काढण्यासाठी म्हणून नवऱ्याने मोबाइलवर मॅच बघावी, असा पर्याय तिने दिला. पण, नवऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे या दोघांमध्ये चांगलीच भांडणं झाली. दोघे पोलीस ठाण्यात गेले.

समुपदेशकांनी सुचवला मध्यम मार्ग

कुटुंब कल्याण केंद्रात हे प्रकरण गेले. समुपदेशक अमित गौड यांनी या दोघांशीही चर्चा केली. समजावल्यानंतर बायकोच्या सिरिअलच्या वेळी मॅच न बघण्याचे नवऱ्याने मान्य केले. तसेच रविवारी आयपीएलच्या दोन मॅच असतात, त्यातली एक टीव्हीवर तर एक मोबाइलवर बघण्याचेही त्याने मेनी केले. तर बायकोने नवऱ्याला वेळेत चहा नाश्ता आणि जेवण देण्याचे मेनी केले आहे. अशा प्रकारे या दोघांमधील वाद संपून या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र राहायला सुरुवात केली. (IPL husband and wife had an argument over watching the ipl in Agra)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -