जेल आहे की मसाज पार्लर? ‘आप’च्या नेत्याला जेलमध्ये मिळतेय VIP ट्रीटमेंट

is it a prison or a massage parlour video of satyendar jain lodged in tihar jail surfaced created ruckus

मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेल्या दिल्लीच्या आप सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. यावरुन नेमके ते जेलमध्ये आहेत की मसाज पार्लरमध्ये? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय. मंत्री जैन जेलमधील बेडवर पडले असताना त्यांच्या पायाची एक व्यक्तीकडून आरामात मालिश सुरु असल्याची व्हिडीओत दिसतेय. तर जैन कसले तरी पेपर वाचताना दिसत आहेत. तिहार तुरुंगातील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओनंतर जेल प्रशासनावर आक्षेप याप्रकरणी ईडीने कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

यासोबत जैन यांनी तुरुंगात देण्यात आलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटवरही भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार जेलमध्ये आहेत. जेलमध्ये शिक्षा भोगत असतानाही जैन हे सुखासीन आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट होतेय. याबाबत चौकशीही सुरु झाली आहे.

सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी ईडीने ताब्यात घेतले. सध्या जैन हे तिहार जेलमध्ये सात नंबरच्या सेलमध्ये आहेत. दरम्यान त्यांनी मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आल्यानंतर जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासोबत 35 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही आता गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.


किशोरी पेडणेकरांशी संबंधित ‘त्या’ चार सदनिका ताब्यात घ्या; एसआरएचे महापालिकेला आदेश