घरदेश-विदेशकिशोरी पेडणेकरांशी संबंधित 'त्या' चार सदनिका ताब्यात घ्या; एसआरएचे महापालिकेला आदेश

किशोरी पेडणेकरांशी संबंधित ‘त्या’ चार सदनिका ताब्यात घ्या; एसआरएचे महापालिकेला आदेश

Subscribe

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना एसआरएने मोठा दणका दिला आहे. किशोरी पेडणेकर यांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने मुंबई महापालिकेला दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरएने हे आदेश दिले आहेत. सोमय्यांनी वरळी गोमातानगरमधील किशोरी पेडणेकर यांच्या संबंधित चार सदनिकांविषयी एसआरएकडे ही तक्रार केली होती.

पेडणेकरांनी या सदनिका बळकावल्याचा आरोप करत या बेनामी सदनिकांवर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. यानंतर एसआरएने महापालिकेला हे आदेश दिले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता येथे चार सदनिका बेनामी ताब्यात घेतल्या होत्या. महापालिकेने या सदनिका चार दिवसात ताब्यात घ्याव्यात असे आदेश दिल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

SRA अधिकार्‍यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम 3A अंतर्गत निष्कासन Eviction करण्याचे आदेश दिले आहे, पेडणेकर परिवाराने वरळी गोमाता जनता एस आर ए येथील 4 सदनिकांवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची माझी तक्रार होती. पुढील आठवड्यात निष्कासन होणार असं सोमय्यांनी ट्विट करत म्हटले आहे.


..तर हिंदुस्तानचा पाकिस्तान होण्यास वेळ लागला नसता, राऊतांनी रणजित सावरकरांचे कान टोचले


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -