घरदेश-विदेशकोरोनाविरोधात घोड्याच्या अँटीबॉडीज ठरतायत प्रभावी, महाराष्ट्रातील 'या' कंपनीचा दावा

कोरोनाविरोधात घोड्याच्या अँटीबॉडीज ठरतायत प्रभावी, महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा दावा

Subscribe

कोरोना विषाणू रोखण्यासाठी जगभरातील संशोधकांकडून प्रभावी औषध विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच महाराष्ट्रातील एका कंपनीने घोड्यांच्या अँटीबॉडीजपासून तयार केलेल औषध कोरोनाविरोधात अधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. तसेच या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. कोल्हापूरातील चार वर्षे जुनी आयसेरा बायोलॉजिकल कंपनी या कोरोना विषाणूविरोधातील प्रभावी औषधाची चाचणी करत आहे. या औषधाच्या सर्व टप्प्यांतील चाचण्या यशस्वी झाल्यास कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी भारतीय बनावटीचे हे पहिले औषध ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधाचा वापर केला जाणार आहे.

या औषधाच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा सुरु आहे. या चाचणीदरम्यान अपेक्षित असे निष्कर्ष समोर आलेत. तसेच ऑगस्ट महिन्याअखेरपर्य़ंत ही चाचणी पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील आयसेरा बायोलॉजिकल कंपनी आत्तापर्यंत अँटीसीरमचे उत्पादन करते. या कामासाठी कंपनीला सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची मदत मिळतेय. याचदरम्यान कंपनीने कोरोनाविरोधी अँटीबॉडीजचे एक प्रभावी कॉकटेल तयार केले आहे. याच्या वापरामुळे कोरोनाच्या सौम्य आणि मध्य़म लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करता येतील. तसेच शरीरातील कोरोना विषाणू नष्ट करता येईल.

- Advertisement -

आयसीएमआरचे माजी महासंचालक प्रा. एन.के. गांगुली यांनी सांगितले की, या औषधामुळे अपेक्षा अधिक वाढतायत.आता आम्ही औषधाच्या मानवी चाचणीनंतरच्या अहवालाची वाट पाहतोय. जर हे औषध कोरोनाविरोधात उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाल्यास, अधिक फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या देशामध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय औषधांपेक्षा हे औषध स्वस्त असेल. अशी अपेक्षा आहे.

तर आयसेरा बायोलॉजिक्सचे संचालक नंदकुमार कदम यांनी सांगितले की, या कॉकटेल औषधामध्ये कोरोनाविरोधी न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीचा समावेश आहे. कोरोना विषाणूतील अँटीजन घोड्यामध्ये इंजेक्ट करुन ही अँटीबॉडी विकसित केली आहे. योग्य अँटीजनची निवड करण्यासाठी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने मदत केली आहे. तसेच अँटीबॉडी विकसित करणाऱ्या रसायनांची निवड करण्यासाठीही मदत केली आहे. अँटीबॉडी विकसित करण्य़ासाठी घोड्यांची निवड करण्यात आली होती. कारण मोठे जनावर असल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी विकसित होतात.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -