घरदेश-विदेशअखेर 'चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखल

अखेर ‘चांद्रयान २’ चंद्राच्या कक्षेत दाखल

Subscribe

७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन हे सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. श्रीहरिकोटातील प्रक्षेपणाच्या २९ दिवसांनंतर मंगळवारी सकाळी ९ वाजून दोन मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यावेळी, ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल याबाबतची माहिती ते पत्रकार परिषदेत देतील. मंगळवारी सकाळी चांद्रयान २ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून चांद्रयान -२ ने ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी ठरली आहे.

- Advertisement -

७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार

‘चांद्रयान २’ चंद्राच्या कक्षेत पोहोचविण्याची मोहीम आज पुर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या ‘चांद्रयान २’ च्या मिशनसाठी आज मंगळवारी महत्त्वपुर्ण घटना असणार होती. मंगळवारी सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान ही प्रक्रिया झालीअसून, ती आव्हानात्मक होती. या पार्श्वभूमीवर लँडर विक्रम २ सप्टेंबर रोजी ऑर्बिटरपासून वेगळे होईल. ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी लँडरसंबंधी दोन कौशल्यपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहेत, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन म्हटले आहे.

- Advertisement -

चांद्रयान २ आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. सकाळी साडे आठ ते साडे नऊच्या दरम्यान चांद्रयान २ ला विशेष दिव्यातून जावे लागणार आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर हे चांद्रयान ३१ ऑगस्टपर्यंत चंद्राभोवती फिरत राहणार आहे. त्यानंतर ७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -