घरदेश-विदेशकाश्मीर मुद्द्यावर ट्रम्प यांची मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चर्चा

काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प यांची मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चर्चा

Subscribe

काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली आहे. यासंबंधीचे ट्विट त्यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि कलम ३७० हटवल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी दूरध्वनीद्वारे तब्बल ३० मिनिटे चर्चा केली. जवळपास अर्धातास झालेल्या या संवादात द्विपक्षीय संबंधांपासून प्रादेशिक विषयांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदींशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही फोनद्वारे संवाद साधला. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली आहे.

काय आहे ट्विटमध्ये 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या माझ्या दोन चांगल्या मित्रांशी आज फोनद्वारे चर्चा झाली. काश्मीरमधील परिस्थिती कठीण आहे पण दोघांशी उत्तम चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान खान या माझ्या दोन चांगल्या मित्रांशी व्यापार, सामरिक भागीदारी आणि दोन्ही देशांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काश्मीरमधील तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली. परिस्थिती कठीण आहे पण दोघांशी उत्तम चर्चा झाली, असे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

- Advertisement -

मोदींशी झाला हा संवाद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या संवादात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे थेट नाव न घेता त्यांच्या भारतविरोधी वक्तव्याबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. या संवादात द्विपक्षीय संबंधांपासून प्रादेशिक विषयांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दहशतवादमुक्त आणि हिंसाचारविरहीत वातावरणाची गरज मोदी यांनी या वेळी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा –

‘ईडी’च्या नोटीसीनंतर आता मनसेची मुंबईत बॅनरबाजी

महिला बचत गटांच्या मेहनतीला उत्तम मार्केटिंगची जोड हवी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -