घरदेश-विदेशITR फायलिंगमध्ये OTP चा अडथळा, आयकर विभागाचे महत्वाचे अपडेट

ITR फायलिंगमध्ये OTP चा अडथळा, आयकर विभागाचे महत्वाचे अपडेट

Subscribe

इनकम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Returns) फाईल करण्याची मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतशी आयकर दात्यांची मोठी गर्दी इनकम टॅक्स रिटर्न्स (ITR) फाईल करण्यासाठी होत आहे. बुधवार ३० डिसेंबर रोजी सकाळपासूनच जवळपास ८ लाख ९६ हजार ६१७ इतक्या मोठ्या प्रमाणात आयटीआर फाईल करण्यात आली. अवघ्या एका तासात १ लाख ६७ हजार ०९३ इतक्या मोठ्या प्रमाणात आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. अवघे काही तास उरलेले असतानाच आता आयटीआर फाईल करणाऱ्यांची मोठी संख्या दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२० साठी हे आयटीआर दाखल करण्यात आले.

अखेरच्या वेळी ई रिटर्न्स फाईल करतानाच अनेकांना आधारशी संबंधित ओटीपी मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. आयकर विभागानेही हा विषय लवकरच हाताळण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ओटीपीसाठी काही अडचण येत असला तरीही, ईआयटीआर दाखल केल्यानंतर १२० दिवसात आधार ओटीपी वापरून हे वेरीफिकेशन पुर्ण करता येईल असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

आतापर्यंत एकुण ४ कोटी ७७ लाखांपेक्षा अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. ज्यांनी आयटीआर दाखल केला नाही, त्यांनी तत्काळ दाखल करावा असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयकर विभागाकडून प्रत्येक तासाला आयटीआर भरणाऱ्यांची माहिती अपडेट केली जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -