घरताज्या घडामोडीनववर्षाचे स्वागत परिवारजनांसोबत करावे

नववर्षाचे स्वागत परिवारजनांसोबत करावे

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे आवाहन

नाशिक । कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याकडून अथक परिश्रम घेण्यात आले आहेत. या परिश्रमांचे फलित म्हणून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी ठेवत आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी येणार्‍या नववर्षाचे स्वागत घरात राहूनच परिवारजनांसोबत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

सरत जाणार्‍या यावर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अनेकविध संकटांना आपण अजूनही सामोरे जात असून यामुळे आपणा सर्वांचे जीवनमान पूर्णपणे बदलून गेले आहे. या कोरोना संकट काळात सावरण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला केले सहाकार्य तसेच अनेकांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. तसेच जिल्ह्यातील मृत्यूदराचे प्रमाण कमी असून व बरे होणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळेच जिल्ह्यातील ११ हजार कोरोना बाधितांची रूग्णसंख्या १९०० पर्यंत आटोक्यात आणण्यासाठी आपण यशस्वी झालो आहोत. यातूनच बाधितांची ही संख्या पूर्णपणे शुन्यावर नेण्यासाठी यापुढेही प्रशासकीय यंत्रणामार्फत प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी देखील नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

सध्याच्या काळात इतर देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढत असतांना त्यातून बचावासाठी अजूनही उपाय शोधण्यास शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आपणच आपल्यावर काही निर्बंध घालणे गरजेचे असल्याने येत्या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी मनोरंजनाचे कार्यक्रम घरात राहूनच साजरे करणे आवश्यक आहे. मास्क मुक्त जीवन जगण्यासाठी, तसेच कोरोनाचे लसीकरण पूर्ण करून एक सुदृढ आणि आरोग्यदायी दिर्घायुष्य जगण्याचा संकल्प करून येणार्‍या २०२१ या नवीन वर्षाचे स्वागत आपल्या घरातच प्रियजनांच्या समवेत करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -