घरक्रीडाIND vs AUS : नटराजनला पदार्पणाची संधी? उमेश तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता 

IND vs AUS : नटराजनला पदार्पणाची संधी? उमेश तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता 

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या पायाला दुखापत झाली.

पहिल्या कसोटीत नीचांकासह पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेला हा कसोटी सामना ८ विकेट राखून जिंकत भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे उमेश तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणार असून या सामन्यात उमेशच्या जागी टी. नटराजनला पदार्पणाची संधी मिळू शकेल.

डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजनने आयपीएल आणि स्थानिक स्पर्धांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात प्रवेश मिळवला. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ७० धावांत २ विकेट भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर झालेल्या टी-२० मालिकेच्या तीन सामन्यांत सहा विकेट घेतल्या. त्यामुळे कसोटी मालिकेसाठी त्याला नेट्समध्ये गोलंदाजी करण्यास ऑस्ट्रेलियात थांबवण्यात आले. आता सूत्रांच्या माहितीनुसार, नटराजनला तिसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘मोहम्मद शमीला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी निवड समितीने शार्दूल ठाकूरचा कसोटी संघात समावेश केला होता. तसेच भारतीय संघाकडे नवदीप सैनीचा पर्यायही आहे. परंतु, नटराजन डावखुरा गोलंदाज असल्याने त्याची संघात निवड केल्यास गोलंदाजीत विविधता येईल. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे,’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले. नटराजनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळताना आतापर्यंत २० सामन्यांत ६४ विकेट घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -