घरदेश-विदेशलेकाचा आजी-आजोबांकडे जाण्याचा हट्ट; आईनेच रागात केला मुलाचा खून!

लेकाचा आजी-आजोबांकडे जाण्याचा हट्ट; आईनेच रागात केला मुलाचा खून!

Subscribe

आपल्या पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या आईला म्हणजेच कुलविंदरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनदरम्यान अनेक कौटुंबिक हिंसा, घऱगुती वाद आणि अत्याचार यांचे प्रमाण वाढत असताना गुन्हेगारीचे प्रमाणही तितकेच वाढताना दिसत आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीची हद्द दर्शवणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालंधरमध्ये एका आईनेच आपल्या ६ वर्षांच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. आईच्या प्रेमाला काळीमा फासणारी घटना असून ही हत्या रागाच्या भरात केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

असा घडला प्रकार

ही घटना पंजाब मधील जालंधर येथे सोहल जागीर नावाच्या गावात घडली. सोमवारी रात्री १० वाजता ही घटना घडली असून ६ वर्षांच्या एका मुलाने आजी-आजोबांकडे झोपायला जाण्याचा हट्ट धरला म्हणून रागात आईनेच त्याचा खून केला, असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे आजोबा अवतार सिंग यांनी सांगितले की, सोमवारी रात्री त्यांची सून कुलविंदर कौर आणि सासू चरणजीत कौर यांच्यात वाद झाला. त्यांनंतर कुलविंदर मुलगा अर्शप्रीतला घेऊन आपल्या खोलीत गेली, आणि तिने आतून लॉक लावून घेतले. काही वेळाने अर्शप्रीतच्या ओरडण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर अवतार सिंग यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉक लावल्यामुळे त्यांना दार उघडता येत नव्हते. काही काळानंतर जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा या ६ वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह समोर आला.

तसेच, ६ वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना अवतार सिंग यांनी अर्शप्रीतला उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुलविंदर त्यांच्यावरही चाकू घेऊन सुनेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर अवतार सिंग यांची सून कुलविंदर सिंगने मुलाचा खून केल्यानंतर स्वत: घराच्या गच्चीवरून उडी मारली. यावेळी ती जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आपल्या पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या आईला म्हणजेच कुलविंदरवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खळबळजनक! महसूल अधिकाऱ्याने केला तरुणीवर बलात्कार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -