घरदेश-विदेशजालियनवाला बाग हत्याकांडाचा यांनी घेतला होता बदला

जालियनवाला बाग हत्याकांडाचा यांनी घेतला होता बदला

Subscribe

इंग्रजांच्या काळातील सर्वात नृशंस हत्याकांड म्हणून जालियनवाला बाग हत्याकांडाकडे पाहिले जाते. स्वतंत्र भारताच्या लढ्यात इतिहासाचे एक काळे पान म्हणून हा दिवस ओळखला जातो.

13 मे 1919 मध्ये घडलेल्या या घटनेला आज 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. ब्रिटिशांच्या राज्यातील क्रूरकर्मा जनरल डायरने दिलेल्या आदेशानंतर शिपायांनी केलेल्या गोळीबारात हजारभर भारतीय मारले गेले. त्यात लहान मुले, वृद्ध, स्त्रिया यांचाही समावेश होता. या घटनेने संपूर्ण देशच नव्हे, तर जगही सुन्न झाले होते. मात्र या हत्याकांडाचा बदला अखेर एका निधडड्या छातीच्या क्रांतीकारकाने घेतला. त्यांचे नाव उधमसिंह.

- Advertisement -

पंजाबमध्ये जन्म झालेले उधमसिंह क्रूरकर्मा जनरल मायकल डायरच्या हत्येसाठी ओळखले जातात. लहानपणी त्यांचे नाव शेर सिंह असेही होते. त्यांनी 13 मार्च 1940 रोजी लंडनमधील कॅक्सटन हॉलमध्ये जनरल डायरला गोळ्या घालून ठार केले. मात्र त्यानंतर ते पळून गेले नाहीत. त्यांनी निधड्या छातीने या कृत्याची कबुली देत अटक करवून घेतली. 31 जुलै 1940 रोजी त्यांना पेंटनव्हिल येथील कारागृहात तुरूंगात फासावर चढविले.

- Advertisement -

उधम सिंह लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचा जालियनवालाबाग हत्याकांडात झाल होता. त्यानंतर त्यांना आपल्या मोठ्या भावासोबत अमृतसरच्या एका अनाथआश्रमात राहावे लागले होते. आई वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती. पुढे त्यांचा हा भाऊही त्यांना सोडून जगाचा निरोप घेता झाला.

सन 1934 मध्ये ते लंडनमध्ये पोहोचले. तिथे ते स्ट्रिट कमर्शियल रोडवर राहू लागले. तेथे फिरण्यासाठी त्यांनी एक कार विकत घेतली होती. तसेच आपल्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी 6 गोळ्यांची रिव्हॉल्वरही विकत घेतली होती. त्यानंतर 6 वर्षांनी त्यांनी मायकल डायरला यमसदनी पाठविले. तो दिवस होता 13 मार्च 1940. लंडन येथे रॉयल सेंट्रल सोसायटीची एक बैठक कॉक्सटन हॉलमध्ये होती. त्या बैठकीसाठी मायकल डायरही तेथे उपस्थित होता. उधमसिंह यांनी पुस्तकात खाच पाडून आपले रिव्हॉल्वर लपविले होते. त्यामुळे कुणाला संशय आला नाही. बैठक संपल्यानंतर हॉलजवळच असलेल्या भिंतीमागून उधम सिंह यांनी मायकल डायर वर दोन गोळ्या झाडल्या. त्यात तो जागीच ठार झाला. 4 जूनला उधम सिंह यांना दोषी ठरविले जाऊन फासावर लटकाविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -