घरदेश-विदेशJammu Kashmir Encounter : शोपियानच्या हरिपोरा भागात सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन...

Jammu Kashmir Encounter : शोपियानच्या हरिपोरा भागात सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना जवानांचा घेराव

Subscribe

जम्मू- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून सामान्य लोकांना लक्ष्य करून अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर आपली पकड घट्ट केली आहे. बुधवारी अवंतीपोरामध्ये दोन दहशवाद्यांना ठार करण्यात आले, यानंतर सुरक्षा दलांनी गुरूवारी पुन्हा एकदा शोपियान जिल्ह्यातील हरिपोरा भागात दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा शोपियानच्या हरिपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. यावेळी एसओजी, आर्मी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक त्या भागात तात्काळ पोहोचले आणि त्यांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. या शोध मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना आपल्या जवळ येताना पाहिले तेव्हा त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. गोळीबार सुरू होताच सतर्क जवानांनीही आपली पोझिशन घेतली आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. दरम्यान, दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधीही देण्यात आली. मात्र अद्यापही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.


नियोजित वेळेच्या एक दिवस आधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपुष्टात येण्याची शक्यता

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -