घरदेश-विदेशJammu & Kashmir Poonch Terrorist attack: पाकिस्तानवर होणार तिसरा सर्जिकल स्ट्राइक?

Jammu & Kashmir Poonch Terrorist attack: पाकिस्तानवर होणार तिसरा सर्जिकल स्ट्राइक?

Subscribe

२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदा भारतीय सेनेवर हा इतका मोठा आतंकवादी हल्ला झाला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानवर तिसरी सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आली आहे का? भारतीय सेना पाकिस्तानवर तिसरी सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार का?

पूंछ जिल्ह्यातील भिंबर गली ते सँगियोट या मार्गाने जात असलेल्या लष्कराच्या वाहनावर गुरुवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले, तर एक जवान गंभीर जखमी आहे. हुतात्मा जवान राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. परिसरातील दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आलं होतं. दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदा भारतीय सेनेवर हा इतका मोठा आतंकवादी हल्ला झाला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानवर तिसरी सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आली आहे का? भारतीय सेना पाकिस्तानवर तिसरी सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार का? हे जाणून घेऊया.  ( Jammu & Kashmir Poonch Terrorist attack Third surgical strike on Pakistan? )

गुरुवारी दहशतवाद्यांनी जो ग्रेनेड हल्ला केला, त्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने घेतली आहे. ही तीच संघटना आहे जिला भारताने 7 जानेवारी 2023 लाच बॅन केलं होतं. ही दहशतवादी संघटना जैश- ए- मोहम्मद संघटनेचीच एक शाखा आहे जी पाकिस्तानमधून ऑपरेट होते. या दहशतवादी संघटनेची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली होती.

- Advertisement -

पूंछ जिल्हास्थानापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजौरी सेक्टरमधील भिंबर गली ते सँगियोट या मार्गाने लष्करी वाहन जात होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास या वाहनाला अचानक आग लागली. ही आग कशामुळे लागली हे सुरुवातीला स्पष्ट होत नव्हते. मात्र, अधिक तपासानंतर वाहनावर ग्रेनेड हल्ला झाल्याने आग भडकल्याचे स्पष्ट झाले. ‘या हल्ल्याच्या वेळी जोरदार पाऊस सुरू होता. परिसरातील दृश्यमानता कमी होती. ग्रेनेडच्या स्फोटामुळे वाहनाला आग लागली असण्याची शक्यता आहे. जखमी जवानाला राजौरी येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असे लष्कराच्या उत्तर कमांडने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची माहिती दिली. हल्ल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ड्रोन आणि इतर उपकरणांच्या साहाय्याने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर तेथील परिस्थिती शांत असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याचं प्रयत्नांचा एक भाग म्हणून २२ ते २४ मे या काळात श्रीनगरमध्ये जी-२० अंतर्गत पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त आलेले विदेशी प्रतिनिधी बारामुल्ला, दचिगाम नॅशनल पार्क आणि गुलमर्ग येथे जाणार आहेत. राज्याचे प्रशासन या बैठकीच्या तयारीत गुंतले आहे. अशातच लष्कराच्या वाहनाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याने विदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. हा हल्ला जी-२०च्या बैठकीसाठी इशारा असू शकतो, अशीही चर्चा आहे. जी-२० च्या परिषदा जम्मू- काश्मीरमध्ये घेऊन भारत जगाला जम्मू- काश्मीर भारताचा एक महत्त्वाचा भाग असल्याचा संदेश देतं आहे. त्यामुळे हे होऊ नये यासाठी पाकिस्तान या कुरघोड्या करतं आहे. सेनेवरील हे हल्ले येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या या दहशतवादी संघटनांना पाकिस्तान पोसतो आहे. पाकिस्तानची सध्या इतकी वाईट अवस्था आहे की तिथे लोकांना दोन वेळंचं जेवणं नीट मिळत नाही. महागाईने उच्चांक गाठला आहे. बाहेरच्या देशांकडून कर्जही मिळत नाही, असं असूनही पाकिस्तान या दहशतवाद्यांना पोसत आहे.

( हेही वाचा: पाटण्यामध्ये नमाजानंतर ‘अतिक अहमद अमर रहे’ च्या घोषणा, पोलीस सतर्क )

2019 मध्ये जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता तेव्हा भारताने एअर स्ट्राईक करत बदला घेतला होता. तसचं, २०१६ मध्ये जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उरी कॅम्पवर हल्ला केला होता, या हल्ल्यात १९ जवान हुतात्मा झाले होते, त्यावेळीदेखील भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं. तेव्हा भारतीय सैनिक पाकिस्तान सिमेत घुसून तिथले आतंकवादी कॅम्प नष्ट केले होते. त्यामुळे आता पाकिस्तानवर तिसरी सर्जिकल स्ट्राईक होणार का? तशी वेळ आली आहे का? कारण पाकिस्तानला दुसरी कोणतीच भाषा समजत नाही, त्यामुळे पाकिस्तानला जी भाषा समजते त्या भाषेत पाकिस्तानला भारतीय सेना उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -