घरमहाराष्ट्रखारघर दुर्घटना प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, "चूक त्यांची नाही..."

खारघर दुर्घटना प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, “चूक त्यांची नाही…”

Subscribe

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनी खारघरमधील श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. घाटकोपर पूर्व येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये हा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे बडे नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या देखील उपस्थित आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनी खारघरमधील श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादीची ही पूर्वतयारी आहे. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये आता सक्रिय झालेला असल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण कार्यकर्ता मेळावा शिबिर मध्ये राष्ट्रवादीचे दिगज नेते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खारघरमधील दुर्घटना प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

- Advertisement -

“खारघरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेतील आकड्यांवर जाऊ नका. या देशातला एक जरी माणूस मेला तरी ही घटना वाईटच आहे. या घटनेतील मृतांचा आकडा किती आहे, या विचार करून असंवेदनशील नको व्हायला. मी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांकडे अनेकदा गेली आहे. ते आपल्यासाठी एक आदर्शच आहेत. यात त्यांची काही चूक नाही. ते त्यांना मिळालेला पुरस्कार घेण्यासाठी आले होते. त्यांचे अनुयायी त्यांच्यासाठी या कार्यक्रमात आले होते. यात चूक सरकारची आहे.”, असं देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यापुढे बोलताना त्यांनी अजित पवारांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या. “अजित दादांनी जे पत्र लिहिलं ते योग्यच आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणूनच अजित दादा सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. यात कुणीही राजकारण आणत नाही. पण माणूसकी या नात्याने या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे.”

- Advertisement -

“या देशातला प्रत्येक माणूस हा व्हीआयपी असतो. त्याच्या कुटुंबासाठी तो व्हीआयपी असतो. व्हीआयपी हा जो कल्चर आपण काढलाय, यात खारघरमधील दुर्घटेनचं कारण लपलेलं आहे. जे महत्त्वाचे आणि मोठे नेते असतात ते व्हीआयपी आणि बाकी सर्वसामान्य असं नसतं. जर कुणी या प्रकरणातील तथ्य लपवण्याचे प्रयत्न करत असेल तर पूर्ण ताकदीने त्यांच्याविरोधात लढले पाहिजे. यातील आकडे जास्त असले तर आपण लढणार, इतकं असंवेदनशील सरकार आहे. यात एकाचा जरी मृत्यू झाला तरी त्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी केलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -