घरदेश-विदेशJEE Main Admit Card 2021: 'या' तारखेला मिळणार प्रवेश पत्र; २३ ते...

JEE Main Admit Card 2021: ‘या’ तारखेला मिळणार प्रवेश पत्र; २३ ते २६ फेब्रुवारीला होणार परीक्षा

Subscribe

येत्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे मध्ये होणाऱ्या JEE (जेईई) परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच प्रसिद्ध करणार आहे. जेईई परीक्षेचे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलं जाईल. जेईई मेन (JEE MAIN) परीक्षेसाठीचं प्रवेश पत्र फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर होईल. मात्र एनटीएने प्रवेशपत्र जाहीर होण्याच्या तारखांची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रवेशपत्र प्रसिद्ध होताच उमेदवारांना ते jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे.

यावर्षी जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा चार सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. यानंतर, दुसऱ्या सत्राची परीक्षा १५-१८ मार्च रोजी घेण्यात येईल. तिसऱ्या सत्रातील परीक्षा २७-३० एप्रिल रोजी आणि चौथ्या सत्राची २४ ते २८ मे दरम्यान आयोजित केले जाईल. याव्यतिरिक्त, जेईई मुख्य (JEE MAIN) परीक्षा १३ भाषांमध्ये असेल. यावर्षी विद्यार्थ्यांना एकूण ९० पैकी फक्त ७५ प्रश्न सोडवावे लागतील. १५ पर्यायी प्रश्नांचे निगेटिव्ह मारजेटिंग केलं जाणार नाही.

- Advertisement -

जेईई मेन प्रवेश पत्र असं करा डाउनलोड

  • प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आहे.
  • येथे तुम्हाला में पेजवर प्रवेशपत्राची लिंक असेल.
  • तुम्ही क्लिक करताच तुमचे प्रवेशपत्र उघडेल.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -