घरदेश-विदेशमसूद अजहरने पुन्हा उडवली भारताची खिल्ली

मसूद अजहरने पुन्हा उडवली भारताची खिल्ली

Subscribe

केंद्र सरकारने केलेल्या युद्धबंदीच्या घोषणेवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पुन्हा एकदा भारताची खिल्ली उडवली आहे. काश्मीरमधील युद्धबंदीमुळे जेईएमला मोकळीक मिळाली असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

व्हिडिओद्वारे उडवली खिल्ली
जेईएमने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे नेते हिजबुल लष्कराच्या बलिदानाला विसरले असतील तर जेईएम नक्कीच त्याला बदला घेईल असं अझहरनं म्हटलं आहे. तसंच हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांची जेलमधून सुटका करण्यात येईल असंही त्यानं या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितलं आहे. आमच्या मित्रांनी युद्धबंदी नाही जाहीर केली तर त्यांनी जेईएमसाठी मोकळी जागा सोडली आहे अशी भारताची खिल्ली या व्हिडिओतून मसूदने पुन्हा उडवली आहे. आता या ठिकाणी जास्त गोळीबार दिसून येईल असंही त्यानं यामध्ये म्हटलं असून एक प्रकारे धमकीच दिली आहे.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणात तरूण जैश-ए-मोहम्मदमध्ये
काही महिन्यांपूर्वी, शोपियन आणि पुलवामा जिल्ह्यातील काही सैनिकांना मारल्यानंतर पोलीस सुत्रांनी सांगितल्यानुसार, बरेच तरूण जैश-ए-मोहम्मद या संघटनेमध्ये सामील झाले आहेत. जम्मू काश्मीर खोऱ्यातील बऱ्याच हल्ल्यांमागे त्यांचाच हात असल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे. अशा हल्ल्यांसाठी त्यांनी नेहमीच परदेशी लोकांची मदत घेतली आहे.

मसूद बरळण्याची कारणं
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मसूद बरळण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे काश्मीर खोऱ्यातून सर्वात जास्त भरती हिजबूलमध्ये होते, त्यामुळे मसूद अजहर हा सध्या या तरूणांना लालूच दाखवून आपल्या संघटनेमध्ये दाखल करून घेत आहे. तर, दुसरं म्हणजे जेईएम हे युद्धबंदीविरोधात आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची शांतता नको आहे.

- Advertisement -

जेईएम नक्की काय आहे?
मसूद अजहरने जेईएमची १९९८ मध्ये स्थापना केली. स्थापनेपासूनच ही भयानक स्वरुपाची दहशतवादी संघटना म्हणून अस्तित्वात आली. २००१ मधील संसदेवरील हल्ला, २०१६ मधील पठाणकोट एअरबेस आक्रमण आणि जम्मू आणि काश्मीरमधील बरेच हल्ले यासाठी ही संघटना कारणीभूत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -