घरदेश-विदेशभगव्या जर्सीमुळे टीम इंडिया हारली - महबुबा मुफ्ती

भगव्या जर्सीमुळे टीम इंडिया हारली – महबुबा मुफ्ती

Subscribe

भगव्या जर्सीमुळे टीम इंडिया हारली, असे महबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.

रविवारी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव करुन भारताचा विजयरथ रोखला. मात्र, या पराभवानंतर भगव्या जर्सीमुळे भारत जिंकला, असे वक्तव्य जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी केले आहे. टीम इंडियाच्या जर्सीचा रंग बदलण्यात आला आहे. जर्सीचा रंग भगवा करण्यात आला असून या जर्सीत खेळण्याचा टीम इंडियाचा रविवारच्या सामन्याचा पहिला दिवस होता.

नेमके काय म्हणाल्या महबुबा मुफ्की?

टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा केल्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. रविवारी भगव्या जर्सीत टीम इंडियाने इंग्लंडसोबत सामना खेळला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. दरम्यान, भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव असे महबुबा मुफ्की म्हणाल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये महबुबा म्हणाल्या की, ‘तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणा किंवा काहीही, परंतु भगव्या जर्सीमुळेच भारताचा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरोधात पराभव झाला.’

- Advertisement -

भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर

दरम्यान, पराभवाचा भारतीय संघावर फार काही मोठा परिणाम झालेला नाही. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. या सामन्यानंतरही भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे श्रीलंका आणि बांग्लादेश सोबतचे दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे इग्लंड विरोधातील पराभवाचा फारसा काही मोठा परिणाम भारतीय संघावर होणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -