घरदेश-विदेशप्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव; जेट एअरवेजचे इमर्जन्सी लँडिंग

प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव; जेट एअरवेजचे इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

आज सकाळी मुंबईहून जयपूरला निघालेले जेट एअरवेजच्या विमानात धक्कादायक प्रकार घडला आहे. जेट एअरवेजचे क्र. 9W 697 विमान १६६ प्रवाशांना घेऊन मुंबई ते जयपूर जात होते. मात्र जेट एअरवेजच्या बेजबाबदार क्रू मेंबरची एक चूक प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. विमान उड्डाण घेतेवेळी क्रू मेंबरने विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारे बटण दाबण्यास विसरुन गेले. त्यामुळे उड्डाण घेतेवेळी हवेचा दाब वाढून विमानातील १६६ प्रवाशांपैकी ३० प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. अनेकांचे डोके दुखायला लागले. त्यामुळे जेट एअरवेजने विमानाचे इमर्जन्सी लँडिग करावे लागले आहे. अस्वस्थ प्रवाशांवर आता मुंबई विमानतळावर उपचार केले जात आहेत.

- Advertisement -

आज सकाळी मुंबई विमानतळाहून जेट एअरवेजच्या विमानाने उड्डाण घेतले त्यावेळी विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारे बटण दाबण्यासच विमानातील कर्मचारी विसरले. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला. प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे काही अंतरावरुनच विमानाचे पुन्हा इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून केबिन क्रूला कामावरुन काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

इकोनॉमिक टाइम्सचे पत्रकार तरुण शुक्ला हे स्वतः या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. “जेटचे कर्मचारी केबिन प्रेशर संतुलित करायचे विसरले त्यामुळे प्रवाशांच्या नाका-कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर जेटचे कोणतेही कर्मचारी मदतीसाठी आले नाहीत. ऑक्सिजन मास्क घालावेत यासाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. प्रवाशांची सुरक्षा पुर्णपण वाऱ्यावर सोडण्यात आली होती.”, असे ट्विट तरुण शुक्ला यांनी केले आहे.

- Advertisement -

याच घटनेतील दुसरे प्रत्यक्षदर्शी दर्शक हाथी यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. तांत्रिक अडचणीमुळे मुंबई-जयपूर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले असून माझ्यासहित सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -