घरदेश-विदेशझारखंडमध्ये भाजप पराभूत होणार?

झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार?

Subscribe

राज्यात जेएमएम-काँग्रेस आघाडीचं सरकार येऊ शकतं अस एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. भाजपसाठी हे निकाल धक्कादायक असल्याचं मानलं जात आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागले होते. आता लक्ष लागले आहे झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे. २३ डिसेंबर रोजी झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पण तत्पूर्वी एक्झिट पोलचा अंदाज जाहीर झाला आहे. त्यानुसार झारखंडमधील भाजपच्या सत्तेला सुरुंग लागणार आहे. तर राज्यात जेएमएम-काँग्रेस आघाडीचं सरकार येऊ शकतं अस एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. भाजपसाठी हे निकाल धक्कादायक असल्याचं मानलं जात आहे.

जेएमएम-काँग्रेसचं सरकार येणार?

झारखंड विधानसभेची संख्या ८१ आहे. तेव्हा झारखंडमध्ये राजकीय पक्षांना ४१ हा बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. सर्वच वृत्तवाहिन्या आणि संस्थांच्या आकडेवारीनुसार झारखंडमध्ये भाजपला अपयश येणार असे दिसते. तर जेएमएम काँग्रेस आघाडीचं सरकार येण्याची चिन्हं दिसत आहेत.

हेही वाचा – तोट्यातील मंहामंडळे बंद करा – कॅगची शिफारस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -