घरदेश-विदेशमध्य प्रदेशमध्ये कमलनाथ; राजस्थानमध्ये कोण?

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ; राजस्थानमध्ये कोण?

Subscribe

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण राजस्थानमध्ये कोण? हे पाहावं लागणार आहे.

भाजपला धुळ चारत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत आली. पण, आता खरी चुरस सुरू आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदी बसणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पण, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण याबद्दल आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. २४ तासानंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं ११४ जागा जिंकल्या. तर भाजपला १०९ जागांवर ,समाधान मानावं लागलं. सपा आणि बसपानं काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला. पण राजस्थानमध्ये मात्र मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून राजस्थानमध्ये अशोक गेहलोत की सचिन पायलट असा सवाल विचारला जात आहे. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं वातावरणात काहीसा गरमपणा जाणवत आहे. पण, राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा काँग्रेसच्या हायकमांड घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे हायकमांड कुणाला पसंती देणार हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

सचिन पायलट यांनी राजस्थानच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे. पण, दुसरीकडे अशोक गेहलोत यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण?

वाचा – मायावतींचा ‘हाथी’ बनला काँग्रेसचा ‘साथी’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -